अकोला : ‘लोकमत’चे निंभोरा येथील ग्रामीण वार्ताहर पद्माकर लांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या अनिकेत सरप नामक आरोपीस अकोट फैल पोलिसांकडून बुधवारी अटक करण्यात आली आहे. तर याच हल्ल्यात सहभागी असलेल्या व दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. या हल्ल्यामध्ये लांडे यांच्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर हल्ला करणाºया दोन अज्ञात आरोपींविरुद्ध अकोट फैल पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वार्ताहर पद्माकर लांडे यांनी गत काही दिवसांमध्ये रेतीमाफिया तसेच धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध वृत्त प्रकाशित केले होते. त्यामुळे गैरकारभार करणाºया यामधीलच काही जणांना लांडे यांचे वृत्त पचनी न पडल्याने त्यांनी लांडे यांच्यावर मंगळवारी सकाळी दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात इसमांनी प्राणघातक हल्ला केला होता. लांडे यांना एका खासगी वाहनाने सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, लांडे यांच्यावर हल्ला करणाºया मारेकºयांमध्ये अनिकेत सरप हा असल्याचे समोर येताच अकोट फैल पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. याप्रकरणी अनिकेत सरप याच्यासह अज्ञात मारेकºयांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्रकार संरक्षण कायद्यानुसारही या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची प्रक्रिया पोलिसांकडून करण्यात येत असल्याची माहिती आहे. पद्माकर लांडे यांच्यावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा पत्रकार संघटनांनी जाहीर निषेध केला असून, दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
वार्ताहर लांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 4:31 PM