अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, रविवार २० सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील आणखी एक कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने मृतांचा एकूण आकडा २०९ वर गेला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ९७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ६५३२ झाली आहे. दरम्यान, रविवारी आणखी ४० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २९९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ९७ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २०२ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये मुर्तिजापूर येथील २१ जणांसह वाडेकर लेआऊट येथील सहा, जीएमसी व जुने शहर येथील प्रत्येकी चार, मोठी उमरी व चांन्नी ता. पातुर येथील प्रत्येकी तीन, पातुर येथील दोन, सुधीर कॉलनी, आनंद नगर,शास्त्री नगर, अकोट, गीता नगर, हिवरखेड, खदान, अकोला शहर, जठारपेठ, जामठी, सिरसो, बालाजी नगर, घुसर, सुयोग कॉलनी व तापडीया नगर येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. आज सायंकाळी पॉझिटीव्ह निदान झालेल्यांमध्ये जीएमसी येथील सात, अकोट येथील पाच, बालाजी नगर, अकोट फैल व सिव्हील लाईन येथील प्रत्येकी दोन, कृषी नगर, चांदूर, डाबकी रोड, मुर्तिजापूर, रणपिसे नगर, गंगा नगर, जीएमसी हॉस्टेल, पिंजर, बाळापूर, खडकी, चांदणी, रामनगर, कौलखेड, पातूर, चोहट्टा बाजार, दहिहांडा, हरिहरपेठ, भांबेरी ता.तेल्हारा, सार्थी, मोठी उमरी व सिरसोली ता. तेल्हारा येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.कुरुम येथील महिलेचा मृत्यूरविवारी मुर्तीजापूर तालुक्यातील कुरुम येथील ५३ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांना १७ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.४० जणांना डिस्चार्जरविवारी दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.१५९१ अॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६५३२ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ४७३२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २०९ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १५९१ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.
दिवसभरात एकाचा मृत्यू; ९७ नवे पॉझिटिव्ह, ४० जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 6:57 PM