अकाेला : अकाेट शहर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील अकाेट शहरातील मच्छी मार्केट येथे अमलीपदार्थांची विक्री करण्यात येत असल्याची माहिती पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाला मिळताच त्यांनी बुधवारी छापा टाकून एक किलाे गांजा जप्त केला.
अकोट शहरातील मच्छी मार्केटजवळ दिलीपसिंह भदोरिया (रा. अकोट) हा अमलीपदार्थांची विक्री करीत असल्याची माहिती पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी पथकासह छापा टाकून भदाेरिया यास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता सुमारे एक किलाे गांजा त्याच्याजवळ आढळला. पाेलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अकाेट शहर पाेलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी अकाेट पाेलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाइ पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.