लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राष्ट्रीय महामार्गावरील बाळापूर शहरानजीक एका मद्यधुंद चालकाने त्याचे वाहन सुसाट चालवित अनेकांना धडक दिल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून, सात ते आठ जण जखमी झाले आहेत. या ट्रकचालकाने समोरून येणाऱ्या ट्रकला जबर धडक दिल्याने ट्रकची डिझल टॅन्क फुटून रस्त्यावरच ट्रकला आग लागली.अकोला येथून शासकीय गोदामातील धान्य बाळापूर येथील शासकीय गोदामात खाली करून परतीच्या प्रवासात असलेल्या एम. एच.४१ जी.७३१७ क्रमांकाच्या ट्रकचालकाने नशेत ट्रक सुसाट वेगाने पळविला. पारस पॉर्इंटवर त्याने एका वाहनाला धडक दिली. त्यानंतर बाळापूर शहरात प्रवेश करत असताना एका गोदामाच्या भिंतीला धडक दिल्याने नागरिकांनी पाठलाग करून चालक सय्यद साजिद सय्यद निजाम (३६) याची धुलाई केली. त्यानंतर ट्रकचालकाने माफी मागून मार्गस्थ झाल्यानंतर भिकूनखेडनजीक समोरून येणाºया एमएच ३० एल ४२७३ क्रमांकाच्या आॅटोला जबर धडक दिली. या अपघातात सगीर अहेमद गुलाम हबीब (५०) जागीच ठार झाले, तर वाहनातील अन्य चौघे जण गंभीर जखमी झाले. त्यानंतर पुन्हा ग्रामीण रुग्णालयासमोर एका कारलासुद्धा चालकाने धडक दिल्याने नागरिकांनी पुन्हा ट्रकचा पाठलाग सुरू केला.त्यामुळे ट्रकचालकाने त्याचे वाहन सुसाट वेगाने पळविल्याने त्याचे नियंत्रण सुटल्याने विरुद्ध दिशेने येणाºया कंटेनरला धडक दिली. त्यामुळे ट्रकचे समोरील टायर फुटले आणि डिझलची टाकीसुद्धा लिकेज झाल्यामुळे ट्रकने पेट घेतला. सुमारे अर्धा तास हा थरार राष्ट्रीय महामार्गावर सुरू होता. या मद्यधुंद ट्रकचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे.
...तर टळला असता अनर्थमाथेफिरू ट्रकचालकाने सुसाट वेगाने वाहन चालवून एकाचा बळी घेतला. मात्र बाळापूर पोलिसानी पहिलीच घटना घडल्यानंतर या ट्रकवर कारवाई केली असती, तर या निष्पाप व्यक्तीचा बळी गेला नसता.