पातूर : अकोलापातूर महामार्गावर शिर्ला फाट्यानाजीक ट्रक व मारुती ओमनी मध्ये सोमवारी रात्री एक वाजताचे दरम्यान अपघात होऊन ओमनी चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोन महिला जखमी असून, त्यापैकी एक महिला गंभीर असल्याचे वृत्त आहे. पातूर येथील पाटील मंडळी येथील रहिवासी प्रमोद पाटील (38) हे आपल्या ओमनी गाडीने पणज येथून नातेवाईकाच्या अंतिमसंस्कारावरून सोमवारी रात्री परत येत असताना त्यांच्या मारुती ओमनी क्रमांक MH 30 AF 3156 व पातूर कडून अकोल्याकडे येत असलेला आयशर ट्रक यांच्यामध्ये समोरासमोर धडक होऊन अपघात झाला.सदर अपघात एवढा भीषण होता की,ओमनी कारचा अक्षरशः चुराडा झाला. चालक प्रमोद बाबुराव पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तर वर्षा प्रमोद पाटील ही महिला जखमी असून शीला बाळू पाटील ही महिला गंभीर जखमी झाली आहे.पणज येथून अंतिमसंस्कार पार पाडून परत येत असताना गाडीत समोर बसून असलेले मुलगी व मुलाला कापशी येथे नातेवाईकांच्या घरीच उतरवले. त्यामुळे सुदैवाने चिमुकल्यांचे प्राण बचावले. जखमींना पुढील उपचाराकरिता अकोला येथे हलविले असून मृतकास शवविच्छेदनाकरिता सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आले आहे.पुढील तपास पातूर पोलीस करीत आहेत.
शिर्ला फाट्यानाजीक ट्रक व कारच्या अपघातात एक ठार, एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2021 10:45 AM
Accident News अपघात एवढा भीषण होता की,ओमनी कारचा अक्षरशः चुराडा झाला.
ठळक मुद्देचालक प्रमोद बाबुराव पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.वर्षा प्रमोद पाटील ही महिला जखमी असून, शीला बाळू पाटील ही महिला गंभीर जखमी झाली आहे.