वाशिम, दि. 0३- हरभरा पिकाची काढणी थ्रेशरव्दारे करीत असतांना थ्रेशरमध्ये शरीर गेल्याने एका जणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शेलगाव बोदाडे येथे ३ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान घडली. मालेगाव तालुक्यातील शेलगाव बोदाडे येथील शरद किसन वाझुळकर (३२) थ्रेशरव्दारे हरभरा पिकाची काढणी करीत होते. अचानक थ्रेशरमध्ये त्यांचा हात व अध्रे शिर घुसल्याने त्यांचा जागीचा मृत्यू झाला. शरदच्या मागे दोन मुले व बराच आप्त परिवार आहे.
थ्रेशरमध्ये अडकून एकाचा मृत्यू!
By admin | Published: February 04, 2017 1:46 AM