शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार; एक गंभीर जखमी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 10:45 AM

Akola Accident News : वसीम शेख व हारुण शेख हे दोघे शनिवार २१ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास अशोकवाटिका परिसरातून दुचाकीने जात होते.

अकोला : अशोकवाटिका चौकात एका ट्रकने दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. घटनेत मृतकाच्या सोबतीला गंभीर दुखापत झाली असून, त्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार,शिवणी परिसरातील रहिवासी वसीम शेख व हारुण शेख हे दोघे शनिवार २१ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास अशोकवाटिका परिसरातून दुचाकीने जात होते. दरम्यान, वाटिका चौकातील लोखंडी दुभाजकाजवळ मागच्या बाजूने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत हारुण शेख हा ट्रक खाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर वसीम शेख हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलीस व शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले.

अपघातानंतर उडाली खळबळ

ट्रकखाली दुचाकीस्वार चिरडल्याने अशोकवाटिका चौकात एकच खळबळ उडाली होती. अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. त्यामुळे सुमारे तासभर वाहतूक खोळंबली होती. काही वेळानंतर वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली.

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघात