शहरासह जिल्ह्यातील सर्व वाहनधारक ज्यात दुचाकी, ऑटोरिक्षा चालक ज्यांच्यावर गत काही दिवसांमध्ये मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड प्रलंबित आहे, अशा वाहन चालक व वाहन मालक यांनी त्यांच्याकडे थकीत असलेला दंड त्वरित अकोला जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये तसेच वाहतूक शाखेच्या काेणत्याही पाेलीस अंमलदाराकडे तसेच वाहतूक शाखा कार्यालयात भरून पावती घ्यावी. दंड भरण्याची सुविधा २४ तास राहणार असून, दंड न भरल्यास अशा वाहनचालकांना नाेटीस पाठविण्यात येणार आहे.
लाेकअदालतमध्येही हाेणार तडजाेड
जिल्ह्यातील एक लाख १२ हजार वाहनचालकांकडे तब्बल तीन काेटी रुपयांचा दंड थकीत असून, हा दंड भरण्यासाठी २५ सप्टेंबर राेजी जिल्हा न्यायालयात आयाेजित लाेकअदालतमध्येही सुविधा करण्यात आली आहे. ज्या वाहन चालकांकडे दंड थकीत आहे, त्यांनी तडजाेड करून दंडाची रक्कम लाेकअदालतमध्येही भरण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे प्रमुख विलास पाटील यांनी केले आहे.