शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
4
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
5
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
6
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
7
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
8
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
9
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
10
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
11
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
12
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
13
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
14
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
15
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
16
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
17
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
18
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
19
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
20
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण

ग्रामगितेतील एक-एक ओळ क्रांती निर्माण करणारी - अरूणभाई गुजराथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 5:15 PM

अकोला: राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे व्यक्तीमत्व सिंधुसारखे आहे. राष्ट्रसंतांच्या साहित्यातून जीवन जगताना माणुसकीला महत्व दिले पाहिजे. याचा विचार रूजुविला. युवकांना स्फूर्ती देणारे, चैतन्य निर्माण करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे साहित्य आहे. ग्रामगीता ही राष्ट्रविकासाचा पाया आहे. त्यामुळे प्रत्येकाने ग्रामगितेतील विचार अंगीकारला पाहिजे. ग्रामगितेतील एक-एक ओळ क्रांती निर्माण करणारी आहे. असे मत विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांनी केले.

ठळक मुद्दे  स्वराज्य भवन प्रांगणात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ४९ वा पुण्यतिथी-पुण्यस्मरण महोत्सवाचे शानदार उद्घाटन

अकोला: राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे व्यक्तीमत्व सिंधुसारखे आहे. राष्ट्रसंतांच्या साहित्यातून जीवन जगताना माणुसकीला महत्व दिले पाहिजे. याचा विचार रूजुविला. युवकांना स्फूर्ती देणारे, चैतन्य निर्माण करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे साहित्य आहे. ग्रामगीता ही राष्ट्रविकासाचा पाया आहे. त्यामुळे प्रत्येकाने ग्रामगितेतील विचार अंगीकारला पाहिजे. ग्रामगितेतील एक-एक ओळ क्रांती निर्माण करणारी आहे. असे मत विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांनी केले.अ.भा. श्री गुरूदेव सेवा मंडळातर्गंत स्वराज्य भवन प्रांगणात शनिवारपासून सुरू झालेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ४९ वा पुण्यतिथी-पुण्यस्मरण महोत्सवाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गुरूकुंज मोझरी येथील अ.भा. श्री गुरूदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे होते. प्रमुख अतिथी म्हणून ह.भ.प गुलाबराव महाराज, काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी आ. बबनराव चौधरी, माजी आ. गजानन दाळू गुरूजी, सावळे गुरूजी, सुशील महाराज वणवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीकांत पिसे पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजकुमार मुलचंदानी, डॉ. पुरूषोत्तम तायडे, प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे, प्रा. डॉ. संतोष हुशे, शेतकरी जागर मंचाचे संयोजक जगदिश पाटील मुरूमकार, कृष्णा अंधारे, मनोज तायडे, नगरसेवक हरिश आलिमचंदानी, डॉ. स्वप्नील ठाकरे, दिलीप आसरे, काशीराव पाटील, प्रा. बाविसकर, रामदास देशमुख, सुधा जवंजाळ, रवींद्र मुंडगावकर, गंगाधरराव पाटील, मधुकरराव सरप, जिल्हा सेवाधिकारी किशोर वाघ, अ.भा. श्री गुरूदेव सेवा मंडळाचे कार्यकारिणी सदस्य भानुदास कराळे, अ‍ॅड. रामसिंग राजपूत, विजय जानी आदी होते.अरूणभाई गुजराथी म्हणाले की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गावोगावी फिरून वैश्विक, सामाजिक एकता निर्माण करण्यासाठी प्रबोधन केले. १९९५५ मध्ये राष्ट्रसंत जपानला गेले आणि भजन, खंजरीने त्यांनी जपानमधील लोकांची मने जिंकली. महात्मा गांधीची देशभक्ती आणि राष्ट्रसंताची देवभक्तीने समन्वय साधला होता. दोघांचेही विचार समाजासाठी प्रेरक आहेत. राष्ट्रसंतांचा विचार प्रत्येकाने आत्मसात करण्याची गरज आहे. असे सांगत, गुजराथी यांनी, जीवनात सेवा नसेल तर सर्व व्यर्थ आहे. आसक्ती, स्वार्थ बाजूला ठेवून निस्वार्थपणे परमार्थ करा. श्वास, विश्वास आणि आत्मविश्वास जीवनात महत्वाचा आहे. अशा शब्दात त्यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीचे अध्यक्ष बलदेवराव पाटील यांनी केले. संचालन शिवाजी म्हैसने यांनी केले तर आभार गजानन काकड यांनी मानले.

टॅग्स :Akola cityअकोला शहरRashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराजSwarajya Bhavanस्वराज्य भवन