शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १,१४७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी तीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १,१४४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये चिखलगाव, शिवणी व कौलखेड येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
९२ वर्षीय महिलेचा मृत्यू
रविवारी (दि.१३) अकोला शहरातील गड्डम प्लॉट येथील ९२ वर्षीय महिलेचा उपचार दरम्यान मुत्यू झाला. त्यांना ३ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.
रॅपिड चाचण्यांमध्ये तीन पॉझिटिव्ह
रविवारी दिवसभरात झालेल्या ४८ रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये केवळ तीन जण पॉझिटिव्ह आढळून आले. आतापर्यंत झालेल्या २६,९४० चाचण्यांमध्ये १८५९ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
२४ जणांना डिस्चार्ज
रविवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १७, आयकॉन हॉस्पिटल येथून दोन, युनिक हॉस्पिटल येथून एक, हॉटेल रिजेंसी येथून दोन, हॉटेल स्कायलार्क येथून दोन, अशा एकूण २४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
७२३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९८६७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८८४१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३०३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ७२३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.