अकाेला : गुन्हेगारांवर लक्ष ठेवून त्यांच्या हालचाली टिपण्यासाठी पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात तब्बल २९४ पाेलीस कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात करून त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील तब्बल एक २४६ गुन्हेगारांना दत्तक घेण्यात आले आहे. या गुन्हेगारांना दत्तक घेताच गुन्हेगारी आटाेक्यात आणण्यासाठी माेठी मदत झाली आहे.
गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी, गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी तसेच गुन्हेगारांना गुन्हा करण्यापासून परावृत्त करण्यासाठी १५ ऑगस्टपासून क्रीप्स हा उपक्रम पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत विविध पाेलीस स्टेशन तसेच विविध शाखेत कार्यरत असलेल्या २९४ पाेलीस अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. या २९४ पाेलीस कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच माहिती गाेळा करून गुन्हेगारांवर अंकुश मिळविण्यासाठी २३ नाेडल ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे. २३ नाेडल ऑफिसर व २९४ पाेलीस अंमलदार यांनी जिल्ह्यातील तब्बल एक हजार २४६ गुन्हेगारांना दत्तक घेतले असून त्यांना गुन्हे करण्यापासून राेखण्यात येत आहे. पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पाेलीस अधीक्षक माेनीका राऊत, शहर पाेलीस उपअधीक्षक सचिन कदम, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेष सपकाळ, विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांनी गुन्हेगार दत्तक याेजना राबविण्यास प्रयत्न केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी माेठा हातभार लागला आहे. तसेच हे गुन्हेगार पाेलिसांच्या मदतीने आता याेग्य कामाला लागल्याची माहिती आहे.