शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live:रतन टाटांची अंत्ययात्रा ४ वाजता; वरळी येथील स्मशानभूमीत पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार
2
काँग्रेसला धक्का! ५ टर्म खासदार राहिलेल्या काँग्रेस नेत्याचा मुलगा मनसेत प्रवेश करणार
3
अमेरिकेनं इस्रायलला एक वर्षात दिले 18,47,15,19,00,000 रुपयांचे शस्त्रास्त्र! लिस्ट बघून धक्का बसेल, डोकं गरगरेल
4
PAK vs ENG : WHAT A MATCH! सपाट खेळपट्टीवर पाकिस्तान 'भुईसपाट', इंग्लंडकडून बेक्कार धुलाई
5
"केवळ जिवंत असतानाच नव्हे, तर मत्यूनंतरही..."; सचिन तेंडुलकरची टाटांना भावपूर्ण आदरांजली
6
महायुतीत कुरघोडी! शिंदे गटाच्या आमदाराचं थेट छगन भुजबळांना चॅलेंज; समोर या, मग...
7
लाईव्ह शोमध्ये रतन टाटांच्या निधनाची बातमी कळताच दिलजीतच्या 'या' कृतीचं होतंय नेटकऱ्यांकडून कौतुक
8
Kareena Kapoor : "पुरुषांचं वर्चस्व असलेल्या इंडस्ट्रीत टिकून राहणं कठीण"; करीना कपूरने सांगितला अनुभव
9
चाहत्यांच्या गर्दीत सूरज चव्हाणची तब्येत बिघडली; अंकिता म्हणते, 'त्याला सांभाळायची गरज...'
10
रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला केंद्रातून अमित शाह येणार; पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर
11
रतन टाटांच्या निधनानंतर काय आहे आज कंपनीच्या शेअर्सची स्थिती, किती झाली वाढ किंवा घसरण?
12
Ratan Tata : आजारी कर्मचाऱ्याला पाहायला पुण्याच्या घरी गेले होते रतन टाटा; हा किस्सा सांगून जातो त्यांचा मोठेपणा...
13
संजय राऊतांविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल; लाडकी बहीणविषयी केलेलं वक्तव्य पडलं महागात
14
कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी विमान उडवायला तयार झाले होते रतन टाटा, नेमकं काय घडलं होतं? पुण्यातला आहे किस्सा
15
निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत गटबाजी; मुख्यमंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू?
16
Ratan Tata Net Worth: आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले रतन टाटा; दानच ९००० कोटींवर केलेले...
17
अमिताभ बच्चन यांच्या सिनेमातून रतन टाटांनी घेतली होती बॉलिवूडमध्ये एन्ट्री, पण सिनेमा फ्लॉप ठरला अन्...
18
बापरे! विमान तब्बल ३४००० फूट उंचीवर असतानाच पायलटचा मृत्यू; नेमकं काय घडलं?
19
'ताज' बाहेरचे 'ते' कुत्रे आज पुन्हा पोरके झाले...टाटांनी मिळवून दिली होती हक्काची जागा!
20
Congo Fever : राजस्थानमध्ये खतरनाक आजाराची एन्ट्री; कांगो तापाने महिलेचा मृत्यू, सरकारने जारी केला अलर्ट

जिल्ह्यात एक हजारावर कुपोषित बालक

By admin | Published: May 18, 2014 7:56 PM

अकोला जिल्ह्यात सुमारे एक हजारावर कुपोषित बालक असल्याची माहिती समोर आली आहे.

अकोला - कुपोषित बालकांचे प्रमाण कमी करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळप˜ी सुरू असतानाही जिल्ह्यात सुमारे एक हजारावर कुपोषित बालक असल्याची माहिती समोर आली आहे. कुपोषण निर्मूलनासाठी शासकीय कर्मचार्‍यांचे निरुत्साही धोरण कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. कुपोषणाला कमी करण्यासाठी आरोग्य कर्मचार्‍यांचे हे धोरण आड येत असल्याचा आरोप सामाजिक संस्थांकडून करण्यात येत आहे.जिल्ह्यात १ हजार ४२४ अंगणवाड्या असून, यामध्ये १ हजार ४४४ बालकं कुपोषित आढळली आहेत. अंगणवाड्यांमध्ये या बालकांना सकस आहार व इतर योजनांचा लाभ मिळवून देण्यात येत असून, त्यासाठी वर्षाकाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहेत. मात्र कुपोषित बालकांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या अखत्यारित जिल्ह्यात ९ प्रकल्प कार्यालय आहेत. या कार्यालयाच्या अधिनस्त जिल्ह्यात १ हजार २४६ नियमित व १३९ मिनी अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांमध्ये ० ते ६ वर्ष वयोगटातील १ लाख २ हजार ५२२ मुलांना लाभ देण्यात येत आहे. यापैकी १ हजार १९१ कमी वजनाचे आणि दंडघेरानुसार १२१ मुले कुपोषित असून, महापालिका क्षेत्रात १३२ मुलांचे वजन अतितीव्र कमी स्वरूपाचे आहे. जिल्ह्यात अशाप्रकारे एकूण १ हजार ४४४ बालक कुपोषित आढळली आहेत. ० ते ६ वर्ष वयोगटातील बालकांच्या सुधारणेसाठी सार्वजनिक आरोग्य खात्यामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येतात. आरोग्य उपसंचालक हे त्यांचे नियंत्रण अधिकारी म्हणून कामकाज पाहत असताना अकोला जिल्ह्यातील ही आकडेवारी भयावह असून, यापेक्षाही जास्त प्रमाण वर्‍हाडातील इतर चार जिल्ह्यांचे आहे. त्यामुळे आरोग्य उपसंचालक करताहेत तरी काय, असा सवाल सामाजिक संघटनांकडून उपस्थित केला जात आहे. कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य उपसंचालक यांची नियंत्रण अधिकारी म्हणून स्वतंत्र जबाबदारी आहे. पाचही जिल्ह्यातील ० ते ६ वर्ष वयोगटातील मुलांची सुधारणा व्हावी, यासाठी त्यांच्याकडे विशेष अधिकार आहेत. मात्र आरोग्य उपसंचालकांचे कुपोषण कमी करण्याकडे सपशेल दुर्लक्ष असल्याने कुपोषित बालकांची संख्या नियंत्रणात येत नसल्याचे स्पष्ट होत आहे.