लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : अकोट बाजार समितीमध्ये नाफेडमार्फत २६ जुलै रोजी तूर खरेदीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी सीसी कॅमेºयात निगराणीत ५६ शेतकºयांची १ हजार २८ क्विंटल ३५ किलो तुरीचे मोजमाप करण्यात आले.गेल्या अनेक महिन्यांपासून तूर खरेदीकरिता शेतकरी ताटकळत होते. शासनामार्फत जिल्हाधिकाºयांनी आदेश दिल्यानंतर गोदाम व ग्रेडरअभावी २५ जुलै रोजी मोजमापाला प्रारंभ होऊ शकला नाही. दरम्यान, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी कारवाईचा बडगा उगारल्यानंतर २६ जुलै रोजी बाजार समितीच्या आवारात नाफेडने तूर खरेदी सुरू केली. अकोटमध्ये ४ हजार ४१४ शेतकºयांना तूर खरेदीचे टोकन देण्यात आले आहेत. त्यानंतर टोकनधारक शेतकºयांची जास्तीत जास्त २५ क्विंटल तूर खरेदी करण्याचे ठरले आहे. त्यानुसार आज बाजार समितीच्या आवारात तुरीचे मोजमाप करण्यात आले. यावेळी नाफेडचे ग्रेडर जाजू, खरेदी-विक्री संघाचे झापे, बाजार समितीचे सहायक सचिव विनोद कराळे, सहायक निबंधक सहकारी संस्थेचे वानखडे यांच्या उपस्थितीत खरेदीला प्रारंभ करण्यात आला.यावेळी शेतकºयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ३१ जुलैपर्यंत टोकनधारक शेतकºयांच्या तुरीची खरेदी करण्याचे निर्देश व टोकनधारकांची संख्या पाहता पाच दिवसांत एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकºयांच्या तुरीचे मोजमाप होणार की नाही, याबाबत शेतकºयांमध्ये साशंकता व्यक्त होत आहे.
अकोटात एक हजार क्विंंटल तुरीचे मोजमाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 2:49 AM
अकोट : अकोट बाजार समितीमध्ये नाफेडमार्फत २६ जुलै रोजी तूर खरेदीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी सीसी कॅमेºयात निगराणीत ५६ शेतकºयांची १ हजार २८ क्विंटल ३५ किलो तुरीचे मोजमाप करण्यात आले.
ठळक मुद्देसीसी कॅमे-यात निगराणीत तुरीचे मोजमाप