राजरत्न सिरसाट ।लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) बियाण्यात सदोषता आढळत असल्याचा आरोप होत असल्याने यावर्षी महाबीजने चाचणीत पात्र असलेले एक हजार क्ंिवटल बियाण्यांचे व्यावसायिक विपणन थांबवले आहे.शेतकºयांचा विश्वासावर महामंडळ सुरू असून, राज्यातील शेतकºयांच्या हितासाठी स्थापन करण्यात आल्यानेच महामंडळाची उत्तरोतर प्रगती सुरू आहे. विश्वासार्हतेमुळे महामंडळ सतत नफ्यात आहे. गतवर्षीसुध्दा ७० कोटी रुपये नफा झाला आहे. यावर्षीही ७२५ कोटी ३५ लाख रुपयांचा बियाणे विक्रीचा व्यवसाय केला आहे.या महामंडळाने देशातील सर्वच बियाणे महामंडळाला याबाबतीत मागे टाकले आहे. महाबीजची तुलना ही राष्ट्रीय बियाणे महामंडळासोबत केली जात आहे. शासनाच्या निर्देशानुसार अनुदानावर बियाणे वाटप करणाºया महाबीजने शेतकºयांना दिलासा दिला आहे. खासगी कंपन्यांच्या बियाणे दराच्या स्पर्धेत शेतकºयांना दिलासा देण्यासाठी नवे बियाणे संशोधन केले आहे.राज्यातील शेतकºयांना दर्जेदार व किफायतशीर बियाणे उपलब्ध होण्यासाठी २८ एप्रिल १९७६ रोजी महाबीजची स्थापना करण्यात आली आहे. खासगी कंपन्यांच्या वाढीव बियाणे दरावर यामुळे काही प्रमाणात अंकुश लागला आहे. राज्यातील शेतकºयांच्या गरजेनुसार हवामानातील बदलाला पुरक उच्च दर्जाचे संकरित व सुधारित संशोधित वाण विकसित करू न दिले आहे. याच उद्देशाने १९९२ मध्ये महामंडळाने संशोधन व विकास विभागाची स्थापना केली आहे. आतापर्यंत संकरित ज्वारी, सूर्यफूल, कापूस, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद व भाजीपाला या पिकांच्या संशोधनास प्राधान्य दिले असून, शेतकºयांना हे बियाणे उपलब्ध करू न दिले आहे. यामध्ये संकरित ज्वारी महाबीज -७, मूग- उत्कर्षा, संकरित बाजरी महाबीज - १००५, संकरित मका उदय हे वाण भारत सरकारने अधिसुचित केले आहेत. तसेच संकरित कपाशी वाणामध्ये बी.टी. जनूक टाकण्याचे काम प्रगतीपथावर आहे. संकरित कपाशी पीकेव्ही हाय-२, बीजी-२ व एनएचएच-४४, बीजी-२ या वाणांना कृषी विभाग व भारत सरकारने मराठवाडा विभागाकरिता कोरडवाहू लागवडीस नुकतीच मान्यता दिली आहे. यातील पीकेव्ही हाय-२ व वरील इतर वाणांची संपूर्ण राज्यात लागवड करण्याकरिता कृषी विभाग व भारत सरकारकडे मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.महाबीजने आंतरराष्टÑीय पीक उष्ण कटिबंधीय पीक संशोधन संस्थेसोबत (आयसीआरआयएसएटी) करार करू न ज्वारी, बाजरी या पिकांमध्ये नवीन संशोधित वाण निर्मितीचे काम सुरू आहे. मक्याचे उत्कृष्ट संकरित वाण देण्यासाठी महाबीजने आंतरराष्टÑीय मका आणि गहू विकास केंद्र हैदराबाद (सीआयएमएमवायटी) या संस्थेसोबत करार केला आहे. वाण निर्मितीचे काम येथे प्रगतीपथावर आहे. खासगी कंपन्यांसोबत सुद्धा याबाबतचे करार करण्यात आले आहेत.पुढील तीन वर्षांचे नियोजनराज्यात लागणाºया एकूण बियाण्यांपैकी महाबीजचे ४० टक्के बियाण्यांनाचा विक्रीत हिस्सा आहे. त्या अनुषंगाने लागणाºया बियाण्यांचा आढावा घेण्यात आला आहे. कृषी आयुक्तालय व महाबीजच्या संयुक्त सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. तो दरवर्षी घेण्यात येत असून, यावर्षी पुढील तीन वर्षात लागणाºया १२५ टक्के एवढा विविध पीक वाणाचा बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येतो.महाबीजची स्थापनाच राज्यातील शेतकºयांचे हित डोळ््यासमोर ठेवून करण्यात आली आहे. किफायतशीर व दर्जेदार बियाणे उपलब्ध करू न देण्याची जबाबदारी आमची आहे. म्हणूनच शेतकºयांचा विश्वास प्राप्त केला आहे. २०१६-१७ मध्ये ७० कोटींवर नफा मिळाला आहे. शेतकºयांना विविध पिकांचे भरघोस उत्पादन देणाºया वाणांची निर्मिती केली आहे.- ओमप्रकाश देशमुख,व्यवस्थापकीय संचालक, महाबीज, अकोला.
एक हजार क्विंटल बियाणे बीजोत्पादनासाठी वापरलेच नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:16 AM