अकोला :अकोला शहर व जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, दररोज मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. शुक्रवार, ३ जुलै रोजी कोरोनामुळे अकोला शहरातील आणखी एकाचा मृत्यू झाला. तर दहा नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे कोरोनाबाधितांच्या मृतांचा आकडा ८४ वर गेला असून, एकूण बाधितांची संख्याही १६१७ झाली आहे. दरम्यान, २२ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे ३११ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.विदर्भात नागपूरनंतर सर्वाधिक कोरोनाबाधितांचे शहर अशी ओळख झालेल्या अकोल्यात रुग्णांचा व कोरोनाच्या बळींचा आकडा दररोज वाढत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी दिवसभरात एकूण १८५ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यामध्ये सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित १७५ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये तीन महिला व सात पुरुषांचा समावेश आहे. हे रुग्ण पातूर, मोठी उमरी अकोला, पारस, इकबाल नगर बुलडाणा, वाकेकर हॉस्पिटल जळगाव जामोद जि. बुलडाणा(हा रुग्ण ओझोन हॉस्पिटल येथून संदर्भित आहे), बार्शीटाकळी, बाळापूर, अडगाव ता. तेल्हारा, मोठी उमरी, सिंधी कॅम्प येथील रहिवासी आहेत.
६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यूशुक्रवारी पहाटे एका रुग्णाचा मृत्यू झाला. सदर रुग्ण ६५ वर्षीय पुरुष असून, ते शंकरनगर येथील रहिवासी आहेत. त्यांना २३ जून रोजी दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी पहाटे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ८४ झाला आहे.
२२ जणांना डिस्चार्जशुक्रवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पाच जणांना तर कोविड केअर सेंटर मधून १७ जणांना असा एकूण २२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. हे रुग्ण लक्कडगंज, संदीप सोसायटी, दगडी पुल, हैदरपूरा व बाळापूर येथिल रहिवासी आहेत, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून कळविण्यात आले. तर आज सायंकाळी कोविड केअर सेंटर मधून १७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात चार जण हरिहर पेठ येथिल, चार जण अकोट फैल येथील तर तीन जण तार फैल, दोन जण भिमनगर, दोन जण गुलजारपुरा तर खडकी व अनिकट पोलीस लाईन येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत,असे कोविड केअर सेंटर मधून कळविण्यात आले आहे. आतापर्यंत १२२२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्यस्थितीत ३११ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशानाने स्पष्ट केले आहे.
प्राप्त अहवाल-१८५पॉझिटीव्ह अहवाल-१०निगेटीव्ह-१७५
आता सद्यस्थितीएकूण पॉझिटीव्ह अहवाल- १६१७मयत-८४ (८३+१)डिस्चार्ज-१२२२दाखल रुग्ण (अॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३११