शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
4
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
5
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
6
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
7
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
8
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
9
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
10
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
11
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
12
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
13
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
14
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
15
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
16
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
17
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
18
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान
19
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
20
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

महिलेचा विनयभंग करणा-या आरोपीला एक वर्ष कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2016 1:24 AM

विवाहितेचा केला होता विनयभंग.

वाशिम, दि. २१- विवाहित महिलेचा विनयभंग करणार्‍या आरोपीला कारंजा येथील विद्यमान न्यायालयाने एक वर्षे कैद, २ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १0 दिवस कैद अशी शिक्षा १९ सप्टेंबर रोजी सुनावणी आहे.धनज बु. पोलीस स्टेशन अंतर्गत कामरगाव येथील २५ डिसेंबर २0१५ रोजीची ही घटना आहे. फिर्यादी महिला ही तिच्या पती व मुलीसोबत दवाखान्यात गेले होते. दवाखाना आटोपून परत येत असताना जिल्हा परिषद शाळेजवळील वळण रस्त्यावर, तिचा पती व मुलगी हे मेडिकलवर औषध आणण्यास गेले. तेवढय़ात आरोपी तमीज शाह वल्द बिस्मील्ला शाह हा मोटारसायकलवर आला आणि फिर्यादी महिलेचा हात धरून विनयभंग केला. ही घटना सदर पीडित महिलेने पतीजवळ कथन आणि पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली. महिलेच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपीविरूद्ध कलम ३५४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला. पोलीस जमादार शंकर जाधव यांनी घटनेचा त पास करुन २८ डिसेंबर २0१५ ला न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणी १९ सप्टेंबर रोजी कारंजा येथील विद्यमान न्यायालयात अंतिम सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर विद्यमान न्यायालयाने आरोपीस १ वर्षे कैद, २ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १0 दिवस कैद अशी शिक्षा सुनावली. पीडित महिलेची बाजू सरकारी वकील साधना सरकटे यांनी पाहिली तर आरोपीची बाजू अँड.बंडाळे यांनी मांडली. या घटनेचा पाठपुरावा उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन धनज बु., ठाणेदार राहुल आठवले व पोलीस उपनिरीक्षक गुट्टे, हे.काँ.शंकर जाधव व पो.काँ. पठाडे यांनी केला.