उद्धव फंगाळ/मेहकर (जि. बुलडाणा): मेहकर तालुक्यातील दादुल गव्हाण येथील महिला सरपंच उज्वला अरुण दळवी यांनी पदभार घेताच गावात जन्मलेल्या पहिल्या मुलीच्या नावाने एक वर्षाचे मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या स्त्रीभृण हत्या, महिला सरंक्षण, ह्यबेटी बचाओ, बेटी पढाओह्ण यासाठी जनजागृती मोठय़ा प्रमाणात सुरु आहे. सरकारकडून युद्ध पातळीवर ह्यबेटी बाचाओ, बेटी पढाओह्ण अभियानासाठी विविध उपक्रमही राबविण्यात येत आहे. दादुल गव्हाण येथील सरपंचपदी अविरोध निवड झालेल्या उज्वला अरुण दळवी यांनी २६ सप्टेंबर रोजी पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान हाती घेऊन, यासाठी जनजागृती करण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी गावामध्ये कोणत्याही समाजामध्ये जी पहिली मुलगी जन्माला येईल त्या मुलीच्या नावाने सरपंचाला मिळणार एका वर्षाचे मानधन हे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये टाकून त्या मुलीच्या लग्नापर्यंत फिक्स डिपॉझीट टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील एका महिला सरपंचाने हाती घेतलेल्या या बेटी बचाओच्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ग्रामीण भागात ह्यबेटी बचाओ, बेटी पढाओह्ण अभियानाची जनजागृती करण्याची गरज आहे. याचाच एक भाग म्हणून मी मला मिळणारे एक वर्षाचे मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. समाजाने बेटी बचाओ अभियानासाठी पुढे आले पाहिजे, अशी गरज सरपंच उज्वला दळवी यांनी व्यक्त केली.
गावात जन्मलेल्या पहिल्या मुलीला देणार एक वर्षाचे मानधन !
By admin | Published: September 30, 2015 12:49 AM