......................................
इंधन दरवाढीचा शेतकऱ्यांना फटका
अकाेला : गत दहा वर्षांपासून शेतीच्या मशागतीसाठी लहान-मोठ्या ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे सध्या इंधनाचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे ट्रॅक्टरद्वारे शेत मशागत करणे शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर आहे. म्हणून यांत्रिक पद्धतीच्या मशागतीला यंदा ब्रेक लागला आहे.
......................................
साहित्य विक्री बंद; मात्र बांधकामे जोरात
अकाेला : लाॅकडाऊनमुळे बांधकाम साहित्य विक्रीची दुकाने बंद असली तरी शहराच्या विविध भागात बांधकामे जोरात सुरू आहेत. खासगीसह सरकारी कामांचाही यामध्ये समावेश आहे. पाण्याची अधिक उपलब्धता असल्याने या कामांची गती लाॅकडाऊनमध्येही कायम आहे.
......................................
खंडित वीज पुरवठ्याने
सिंचनाची समस्या
बाेरगाव मंजू : वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे पिकाला पाणी देण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या भागातील शेतकऱ्यांनी विविध प्रकारची पिके घेतली आहेत. उन्हाचा पारा वाढत असल्याने या पिकांना पाणी देणे आवश्यक आहे.
......................................