अकोला : येणार्या एप्रिल महिन्यात कांद्याची सरासरी किंमत पंधराशे ते सोळाशे रुपये प्रतिक्विंटल राहणार असल्याचा अंदाज डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा कृषी अर्थशास्त्र, सांख्यिकी विभाग व केंद्रीय कृषी विपणन केंद्राने वर्तविला आहे. यावर्षी रब्बी कांद्याचे क्षेत्र २0 टक्क्यांनी वाढले असून, मागील वर्षापेक्षा उत्पादनदेखील वाढण्याची शक्यता असल्याने कांदा उत्पादक शेतकर्यांना कांदा विक्री व साठवणीसंदर्भात योग्य निर्णय या माहितीमुळे घेता येईल.देशात महाराष्ट्र कांदा उत्पादनात अग्रगण्य असून, नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, सोलापूर, नागपूर या जिलंमध्ये सर्वाधिक कांद्याचे क्षेत्र आहे. २१0३-१४ मध्ये राज्याचा कांदा उत्पादनातील देशपातळीवरील वाटा ३0 टक्के एवढा आहे. राष्ट्रीय बागायती मंडळाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील कांद्याचे लागवडीखालील क्षेत्र ४.६८ लाख हेक्टर असून, उत्पादन हे ५८.६७ लाख टन झाले आहे. २0१२-१३ मध्ये कांद्याचे क्षेत्र २.६ लाख हेक्टर, तर उत्पादन ४६.६0 लाख टन होते. यावर्षी २0 टक्के लागवड वाढल्याने उत्पादनात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे.याच पृष्ठभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा कृषी अर्थशास्त्र सांख्यिकी विभाग व नवी दिल्ली येथील राष्ट्रीय कृषी अर्थशास्त्र आणि धोरण संशोधन केंद्राच्या कृषी विपणन केंद्राच्या (एनसीएपी) चमूने लासलगाव बाजारपेठेतील मागील ११ वर्षांच्या कालावधीतील कांद्याच्या मासिक सरासरी किमतीचे पृथ:करण केले. या अभ्यासाच्या निष्कर्षानुसार, बाजारपेठेतील चालू स्थिती कायम राहिल्यास सामान्य हवामानात वेगवेगळ्य़ा प्रतीनुसार कांद्याच्या सरासरी किमती प्रतिक्विंटल पंधराशे ते सोळाशे रुपये राहण्याची शक्यता आहे; परंतु आयात-निर्यात धोरणात होणारे बदल आणि हवामानातील बदल यांचा परिणामही किमतीवर होऊ शकतो. यासंदर्भात कृषी विद्यापीठाच्या कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभागाचे क्षेत्रीय अधिकारी डॉ. आर. जी. देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यावर्षी कांदा लागवड २0 टक्क्य़ांनी वाढली असल्याचे सांगीतले. या पृष्ठभूमीवर कांद्याच्या किमतीचे पृथक्करण करण्यात आले असता एप्रिल महिन्यात कांद्याच्या किमती सरासरी प्रतिक्विंटल १५00 ते १६00 रुपये राहण्याचा या अभ्यासाचा निष्कर्ष काढला असल्याचे सांगीतले.
कांद्याला एप्रिलमध्ये मिळेल १६00 रुपये प्रतिक्विंटल भाव!
By admin | Published: March 18, 2015 1:23 AM