लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शेतकर्यांसाठी शासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत थकबाकीदार शेतकर्यांचे ‘ऑनलाइन’ अर्ज भरून घेण्यात येत आहेत. त्यामध्ये १८ ऑगस्टपर्यंत गत २५ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात केवळ ७ हजार ८७0 थकबाकीदार शेतकर्यांचे ‘ऑनलाइन’ अर्ज भरून घेण्यात आले.सन २00९ ते ३0 जून २0१६ पर्यंत थकबाकीदार राज्यातील शेतकर्यांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार असून, कर्जाची नियमित परतफेड करणार्या शेतकर्यांना २५ हजार रुपयांपर्यंंत प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेल्या शेतकर्यांना विशेष योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत थकबाकीदार शेतकर्यांना कर्जमाफी तसेच कर्जाची नियमित परतफेड करणार्या शेतकर्यांना प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्जाचे पुर्नगठन करण्यात आलेल्या शेतकर्यांना विशेष योजनेचा लाभ देण्यासाठी, संबंधित शेतकर्यांचे ‘ऑनलाइन’ अर्ज शासनाच्या ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर भरून घेण्याची प्रक्रिया जिल्ह्यातील सेतू केंद्रांवर गत २४ जुलैपासून सुरू करण्यात आली आहे. कर्जमाफी योजनेंतर्गत ऑनलाइन अर्ज भरून घेण्याच्या प्रक्रियेत १८ ऑगस्टपर्यंत गत २५ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात केवळ ७ हजार ८७0 थकबाकीदार शेतकर्यांचे ऑनलाइन अर्ज ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर भरण्यात आले आहेत.
कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील सेतू केंद्रांवर आतापर्यंंत ७ हजार ८७0 थकबाकीदार शेतकर्यांचे ‘ऑनलाइन’ अर्ज शासनाच्या ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर (वेबसाइट) भरून घेण्यात आले.- सागर भुतडा, जिल्हा समन्वयक, महाऑनलाइन