जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अकोलाकडून प्राप्त प्रशिक्षण पूर्व सर्वेक्षण फॉर्म चॅट बॉक्स लिंकद्वारे प्रतिसाद नोंदविण्यात आले. डायटचे विषय सहायक गोपाल सुरे, शिक्षण परिषदेचे उद्घाटन करून शिक्षण परिषदेचा उद्देश स्पष्ट करून मार्गदर्शन केले. दुसरे मराठी(भाषा) सेतू अभ्यासक्रम मराठी भाषा उद्दिष्टे, अध्ययन क्षेत्र, कृतिपत्रिकेतील एकूण सहा भाग दिवसनिहाय कृती याबाबत सविस्तर चर्चात्मक संवाद मुख्याध्यापक सुनील राठोड कंझरा यांनी साधला. सत्र तिसरे गणित विषयाची सेतू अभ्यासक्रमाची संकल्पना, विस्तृत संवाद अ.जमिल अ.गणी यांनी साधला.
चौथे आणि पाचवे सत्र विज्ञान विश्लेषण मोनाली सौंदाडे, तर सहावे सत्र इंग्रजी विषय मो. कलिम मो. साबिर धोत्रा उर्दू यांनी घेतले. सातवे सत्रात नोंदीबाबत सविस्तर माहिती केंद्रप्रमुख समूह साधन केंद्र, कंझरा ग. ल. पवार यांनी दिली.