जिल्हा परिषद शाळेत ऑनलाइन शिक्षणाचा फज्जा उडाला आहे. शिक्षण केवळ कागदावरच दिल्याचे दिसून येत आहे. ऑनलाइन, ऑफलाइनसुद्धा शिक्षण दिल्या जात नाही. मंदिरासारख्या किंवा चावडीसारख्या ठिकाणी ऑफलाइन शिक्षण द्यायलासुद्धा चान्नी येथील शिक्षकांना वेळ नाही. त्यामुळे विद्यार्थी वर्गाचे नुकसान होत आहे. याबाबत पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. येथील काही शिक्षक फक्त शाळेत येतात. सर्व शिक्षक बाहेरगावी राहत असल्यामुळे चान्नी येथील विद्यार्थी वर्गाचा शिक्षण थांबले आहे. किमान एक ते दोन तास ऑनलाइन शिक्षण द्यायला पाहिजे; परंतु तेही दिल्या जात नाही. शिक्षक केवळ स्वाक्षरी करण्यासाठी शाळेत येतात. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी शिक्षकांना काही ही घेणे-देणे राहिले नाही. या प्रकरणाची शिक्षण विभागाने चौकशी करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. येथील शिक्षक शिक्षणाविषयी उदासीन असल्याचे दिसून येत आहे. विद्याथ्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाची लिंक मोबाइलवर देत नाही. तसेच ऑफलाइन शिक्षणसुद्धा देत नाहीत, अशी प्रतिक्रिया पालक नारायण काळबांडे यांनी दिली. मुख्याध्यापक एस.एच. पाचपोर यांनी आमच्या शाळेत काही ठरावीक शिक्षक येतात. सह्या करून शिक्षक निघून जातात, अशी प्रतिक्रिया दिली.
चान्नी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ऑनलाइन शिक्षणाचा फज्जा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2020 4:14 AM