जिल्हानिहाय वर्गनिहाय विद्यार्थी
पहिली २९,४१०
दुसरी २९,२४८
तिसरी २९,७८०
चौथी ३०,१८५
पाचवी २९,६५७
सहावी २९,२८९
सातवी २८,८४७
आठवी २८,७९७
नववी २९,३७६
दहावी ३१,४१०
माेबाईल किंवा संगणक आणि इंटरनेट
घरामध्ये दोन ते तीन मुले असतील तर त्यांच्या पालकांना त्यांच्यासाठी मोबाईलची वेगळी व्यवस्था करावी लागते. कारण सर्वांची ऑनलाईन क्लासची एकच वेळ आहे. एक मोबाईलवर एकच विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतो. यासोबतच काही पालकांनी तर मुलांना व्यवस्थित शिक्षण घेता यावे. यासाठी टॅब, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपची व्यवस्था केली. काही रोख स्वरूपात तर काहींनी कर्जावर हप्त्याने संगणक, लॅपटॉप खरेदी केले. त्यातही दर महिन्याला इंटरनेटचा खर्च आलाच. एकंदरीतच ऑनलाइन शिक्षणामुळे पालकांचा खर्च वाढला आहे. त्यामुळे पालकही आता शाळा कधी सुरू होतात, याची वाट पाहात आहेत.
शाळा बंद असल्यामुळे ऑटो रिक्षाचा खर्च कमी झाला. परंतु ऑनलाईन शिक्षणामुळे खर्च वाढला आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी घरातील मुलांसाठी अधिकचा मोबाईल खरेदी करावा लागला. त्यातही नेटवर्कची समस्या आहे. प्रत्यक्षातील शिक्षण आणि ऑनलाईन शिक्षणात मोठा फरक आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांचे लिहिणे, वाचणे कमी झाले आहे.
- वर्षा प्रवीण राऊत, पालक
फारसा खर्च वाढला नाही. शाळेत मुलांना सोडण्यासाठी ऑटो रिक्षाचा, स्कूल बसचा खर्च होताच, तो आता कमी झाला. तो खर्च आता मोबाईल, इंटरनेटवर होत आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी, ऑनलाईन शिक्षणामुळे मुले अभ्यासाशी जुळलेले आहेत.
-महेंद्र जयस्वाल, पालक
मुलांचे होतेय नुकसान
ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांचा मोबाईलवर स्क्रीन टायमिंग वाढला आहे. त्यामुळे डोळ्यांच्या समस्या निर्माण होत आहेत. यासोबतच डोकेदुखीचा त्रास सुरू झाला आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. अलीकडे लहान मुलांचा डोळ्यांचा त्रास वाढल्याचे दिसून येत आहे.
-डॉ. प्रशांत गुलवाडे, नेत्ररोग तज्ज्ञ