१५ जूनपर्यंत नोंदणी : विक्रीकर उपायुक्त यांचे आवाहनअकोला : आगामी १ जुलैपासून देशभरात जीएसटी लागू होत असून, विक्रीकर आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाकडून त्यासाठी विविध मोहीम राबविली जात आहे. शासनाच्या निर्देशान्वये जीएसटीचे प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन सुरू झाले असून, त्याला व्यापारी आणि उद्योजकांकडून प्रतिसाद मिळत आहे. अकोल्यातील व्यापारी आणि उद्योजकांनी येत्या १५ जूनपर्यंत ऑनलाइन प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे, असे आवाहन अकोला विभागाचे विक्रीकर उपायुक्त सुरेश शेंडगे यांनी केले आहे.अकोला जिल्हय़ात व्हॅट भरणार्यांची संख्या जवळपास आठ हजारांच्या घरात आहे. देशभरात लागू झालेल्या जीएसटीनंतर व्हॅट भरणार्यांना जीएसटीची नोंदणी करणे गरजेचे झाले आहे. विक्रीकर विभागातर्फे या नोंदणीतील व्यापारी-उद्योजकांना नोंदणी करण्याच्या सूचना दिल्यात. दरम्यान, शासनाने केंद्राच्या उत्पादन शुल्क आणि विक्रीकर विभागात १ जून ते १५ जूनपर्यंत ऑनलाइन प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन सुरू केले आहे. पहिल्याच दिवशी अकोलेकरांकडून त्यास प्रतिसाद मिळाल्याचे समजते. २0 लाख रुपयांच्या आत ज्यांचा व्यवसाय-उद्योग आहे, त्यांना जीएसटीच्या नोंदणीची आवश्यकता नाही; मात्र त्यापलीकडे व्यवसाय गेलेल्या व्यापारी आणि उद्योजकांनी मात्र ही नोंदणी करणे गरजेचे आहे. ज्या करदात्यांना जीएसटीचा प्रोव्हिजनल आयडी आणि पासवर्ड मिळाला आहे, त्यांनी तातडीने नामांकन करणे गरजेचे आहे. करदात्यांकडून नामांकन अर्ज पूर्णपणे भरणे गरजेचे आहे. त्यानंतर डीएससीई टोकनच्या माध्यमातून जमा करावा लागेल. त्याकरिता अकोल्यातील उद्योजक-व्यापार्यांनी १५ जूनपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही विक्रीकर उपायुक्त शेंडगे यांनी केले आहे.
अकोल्यात सुरू झाले जीएसटीचे ऑनलाइन प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2017 1:53 PM