असा आहे लसींचा साठा
घटसर्प १ लाख
फऱ्या ६० हजार
आंत्रविषार ८० हजार
पशुपालक चिंतित...
दरवर्षी मे महिन्यात होणारे जनावरांचे लसीकरण अजून झाले नाही. पावसाळा सुरू होऊन दोन महिने होत आहेत. त्यामुळे जनावरांमध्ये रोगराई पसरण्याची भीती आहे.
- राजू गावंडे, पशुपालक, सीसा
यावर्षी अद्याप पशुसंवर्धन विभागाने लसीकरण जनावरांचे केले नाही. यामुळे जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. लसीकरण मोहीम लवकरात लवकर हाती घ्यावी.
- पशुपालक, अकोला
जनावरे दगावण्याची भीती
आजारी जनावरांवर योग्यवेळी उपचार मिळत नसल्याने जनावरे दगावण्याची भीती आहे, तर ग्रामीण भागातील पशुपालकांची होत असलेली परवड थांबविण्यासाठी पशुधन विकास अधिकाऱ्यांची मोठी तारांबळ उडत असल्याचे ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.
त्वरित जागा भरण्याची मागणी
विशेष महत्त्वाचे म्हणजे पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा असल्याने निवडक प्रमाणात असलेल्या पशुधन विकास अधिकाऱ्यांवर सेवा देताना मोठा ताण पडत असल्याने पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा त्वरित भरण्याची मागणी पशुपालकांच्या वतीने पुढे येत आहे.