अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यातील धरणात केवळ १३.८० टक्केच जलसाठा शिल्लक असून, पाच धरणातील जलसाठा श्यून्य टक्के आहे. अकोला शहराची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात केवळ ३.३१ टक्केच साठा शिल्लक असल्याने सर्वांनाच दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.वऱ्हाडात ९ मोठे, २४ मध्यम व ४६९ लघू प्रकल्प आहेत. ९ मोठ्या धरणात आजमितीस मंगळवार,२३ जूलै रोजी १४.१८ टक्केच साठा असून,मध्यम धरणात १८.७० टक्के तर लघू प्रकल्पात १०.३० टक्के साठा आहे. हा सर्व साठा १३.८० टक्के आहे. यावर्षी पावसाळ््याच्या सुरू वातीपासूनच अपेक्षीत पाऊस झाला नसल्याने धरणात पूरक साठा उपलब्ध झाला नाही. अनेक धरणाची जलपातळी बुडाला ठेपली आहे तर बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा मोठे धरण शून्य टक्के आहे. अकोला जिल्ह्यातील निर्गृणा,उमा मध्यम धरण शून्य टक्के आहे. वाशिम जिल्ह्यातील सोनल तर बुलडाणा जिल्ह्यातील कोराडी धरणाचा साठा शून्य आहे. या सर्व पृष्ठभूमीवर दमदार पावसाची गरज आहे.
वऱ्हाडातील धरणात केवळ १३ टक्के जलसाठा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 3:28 PM