अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड)) मध्यम व लघु मिळून ४८४ (प्रकल्प)धरण आहेत. मे अखेर या धरणात केवळ १४.९५ टक्के जलसाठा शिल्लक असून, आठ धरणात शून्य तर ११ धरणातील जलसाठा शेवटच्या घटका मोजत आहे. यामुळेच शेतकऱ्यांसह सर्वंच पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील धरणातील जलसाठ्याची स्थिती वाईट आहे. या तीन जिल्ह्यांतील १८ धरणांपैकी एक मोठा व आठ मध्यम धरणातील जिवंत जलसाठा संपला असून, या धरणांची पातळी शून्य टक्के आहे. तर १० मध्यम प्रकल्पात जलसाठा संपण्याच्या मार्गावर आहे. अकोलेकरांची लाइफ लाइन असलेल्या काटेपूर्णा धरणात तर आजचा उपयुक्त जलसाठा १.८० टक्केच आहे. यात अर्धा गाळ असल्याने अकोलेकरांवरील जलसंकट गडद झाले आहे. याच जिल्ह्यातील मोर्णा धरणात ८.६३ टक्के तर निर्गुणा व उमा धरणात शून्य टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातील जलसाठा संपला असून, याच जिल्ह्यातील मस व कोराडी धरणातील जलसाठा शून्य टक्के आहे. आता तोेरणा व उतावळी धरणातील पातळी शून्य टक्क्यावर पोहोचली. वाशिम जिल्ह्यातील सोनल धरणात शून्य टक्के आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा या मोठ्या धरणात १३.५९ टक्के, पेनटाकळी धरणात ४.२२ टक्के, ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात २३.२८ टक्के, पलढगमध्ये ११.७२ टक्के, मन धरणात ७.६६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये १२.१६ टक्के तर एकबूर्जी धरणात ३.५१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. आठ धरणात शून्य साठा ;११ धरणतील साठा संपण्याच्या मार्गावरवऱ्हाडतील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यात ९ मोठे व २४ मध्यम धरण आहेत. अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा ३४.९० टक्के, अकोला जिल्ह्यातील वाण ६२.९७ टक्के मोठ्या धरणातील ही २०. २८ टक्के वारी आहे. २४ मध्यम प्रकल्पातील अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील पाच प्रकल्पात सरासरी २५ ते ३५ टक्के जलसाठा आहे. ४५२ लघु प्रकल्पात ७.०३ टक्के जलसाठा आहे. लघु प्रकल्पाचा जलसाठा पिण्यासाठी वापरला जात नसल्याने हा ७ टक्के जलसाठा १४.९५ टक्क्यातून वजा केल्यास जलसाठ्याचे चित्र भीषण आहे. अकोला, बुलडाणा व वाशिम या जिल्ह्यांची स्थिती मात्र प्रचंड वाईट आहे.