संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकर्यांच्या ‘ग्रीन’ याद्या शासनाच्या ‘पोर्टल’वर ‘अ पलोड ’ करण्याचे काम सुरू आहे; कर्जमाफीस पात्र १ लाख ९१ हजार १८७ शेतकर्यांपैकी केवळ २ हजार ४00 शे तकर्यांच्या याद्या (२४ फाइल)शासनाच्या ‘पोर्टल’वर ‘अ पलोड’ झाल्या. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.कर्जमाफीस पात्र ठरलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकूण १ लाख १२ हजार ४0६ खातेदार शेतकर्यांच्या याद्यांच्या ‘फाइल’ शासनाच्या ‘पोर्टल’वर ‘अपलोड’ करण्यात येत आहे त. एका ‘फाइल’मध्ये सरासरी १00 शेतकर्यांच्या नावांची यादी ‘अपलोड’ केली जात आहे. त्यामध्ये ३0 ऑक्टोबरपर्यंत शे तकरी याद्यांच्या एकूण ४१२ ‘फाइल’ अपलोड करण्यात आल्या असून, त्यापैकी केवळ २४ फाइल (२ हजार ४00 शे तकर्यांच्या याद्या ) शासनाच्या ‘पोर्टल’वर यशस्वीरीत्या ‘अ पलोड’ झाल्या. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील उर्वरित शेतकर्यांच्या ‘ग्रीन’ याद्या ‘पोर्टल’ वर ‘अपलोड ’ होणे अद्याप बाकी आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र शे तकर्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
४१२ पैकी २४ ‘फाइल’ अपलोड!३0 ऑक्टोबरपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जमाफीस पात्र शेतकरी याद्यांच्या ४१२ ‘फाइल’ पोर्टलवर ‘अपलोड’ करण्यात आल्या. त्यापैकी प्रत्यक्ष २४ ‘फाइल’ पोर्टलवर यशस्वीरीत्या ‘अपलोड’ झाल्या. उर्वरित ३७0 ‘फाइल’ पोर्टलवर अंशत: अपलोड झाल्याने, या फाइल पुन्हा ‘अपलोड’ करण्यात येणार आहेत.
‘सर्व्हर’वर ‘लोड’मुळे ‘अपलोड’मध्ये अडथळा!राज्यभरातल्या सर्वच जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र शे तकर्यांच्या ‘ग्रीन ’ याद्या शासनाच्या ‘आपले सरकार पोर्टल’वर ‘अपलोड ’ करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे पोर्टलच्या ‘सर्व्हर’वर अतिभार (हेवी लोड ) येत असल्याने, शेतकरी याद्यांच्या ‘फाईल’ पोर्टलवर अपलोड करताना वारंवार व्यत्यय (एरर) येत आहे. त्यामुळे कर्जमाफीस पात्र शेतकर्यांच्या याद्या ‘पोर्टल’वर अपलोड करण्यात अडथळा निर्माण होत आहे.
कर्जमाफीस पात्र जिल्ह्यातील शेतकर्यांच्या ‘ग्रीन ’ याद्यांच्या ‘फाइल’ शासनाच्या ‘पोर्टल’वर अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत २४ ‘फाइल’ यशस्वीरीत्या पोर्टलवर ‘अ पलोड’ करण्यात आल्या आहेत.- जी.जी.मावळे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)