- संतोष येलकर
अकोला : खरीप पेरण्या आटोपल्या असल्या, तरी जिल्ह्यात २ आॅगस्टपर्यंत केवळ ४१ हजार ६२९ शेतकºयांना ३३३ कोटी ५३ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. पीक कर्जाचे वाटप अद्याप २४.९९ टक्क्यांवरच असल्याने, यंदा जिल्ह्यातील खरीप पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टपूर्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकºयांना १ हजार ३३४ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत ठरविण्यात आले. त्यानुषंगाने गत १ एप्रिलपासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका व ग्रामीण बँकमार्फत पीक कर्ज वाटप सुरू करण्यात आले. खरीप हंगामातील पेरणी, शेतीची मशागत, बियाणे आणि खते खरेदीचा खर्च भागविण्यासाठी शेतकºयांना पीक कर्जाची गरज असते. त्यानुषंगाने जिल्ह्यातील शेतकºयांना तातडीने पीक कर्जाचे वाटप करून, पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांमार्फत जिल्ह्यातील संबंधित बँकांना वारंवार देण्यात आले. परंतु, जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरण्या आटोपल्या असल्या, तरी २ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात केवळ ४१ हजार ६२९ शेतकºयांना ३३३ कोटी ५३ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. खरीप पेरण्या आटोपल्या असताना, पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टाच्या तुलनेत जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाचे प्रमाण केवळ २४.९९ टक्क्यांवरच असल्याने, यावर्षीच्या खरीप हंगामात पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टपूर्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पेरणीपूर्वी झाला नाही कर्जाचा लाभ!खरीप पेरणीपूर्वी पीक कर्जाचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा जिल्ह्यातील शेतकºयांकडून करण्यात आली; मात्र पेरण्या आटोपल्या, तरी २ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात केवळ २४.९९ टक्के पीक कर्जाचे वाटप करण्यात आल्याने, जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांना खरीप पेरणीचा खर्च भागविण्यासाठी पीक कर्जाचा लाभ मिळाला नसल्याचे चित्र आहे.
पीक कर्ज वाटप योजनेंतर्गत २ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात ४१ हजार ६२९ शेतकºयांना ३३३ कोटी ५३ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. कर्ज वाटपाची प्रक्रिया सप्टेंबर अखेरपर्यंत चालणार आहे.- गोपाळ मावळे,जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था )