अकोला : पावसाळ्याचे ४८ दिवस शिल्लक असताना पश्चिम (वºहाड) विदर्भातील पाच धरणांच्या जलसाठ्यात ५० टक्केही साठा झालेला नाही. ५०२ लघू, मध्यम व मोठे प्रकल्प मिळून आजमितीस केवळ ४२.५३ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. यातील अनेक प्रकल्पांत १० टक्क्यांच्या आतच पाणी उपलब्ध आहे. साठेआठ लाख अकोलेकरांची तहान भागविणाऱ्या काटेपूर्णा सिंचन प्रकल्पात केवळ ८.४ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे.पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांत अपेक्षित पावसाअभावी पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर होणार आहे. मोर्णा (२०.३८), निर्गुणा (१३.३८), उमा मध्यम प्रकल्पात ५.४८ टक्केच जलसाठा आहे.बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णात शून्य तर कोराडी मध्यम प्रकल्पही शून्य टक्केच आहे. तोरणात ४.९७ तर उतावळी मध्यमप्रकल्पात ८.१० टक्केच जलसाठा उपलब्ध आहे.वाशिम जिल्ह्यातील अडाण ७.१९ टक्के, सोनल मध्यम प्रकल्पात ११.५२ टक्के जलसाठा आहे. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा मोेठ्या प्रकल्पात ४५.९२ टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील पूस ३९.७८, अरुणावती १२.२४, बेंबळा५७.१६, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा १९.६९, पेनटाकळी प्रकल्पात ६८ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे.
अकोल्याच्या काटेपूर्णा धरणात केवळ ८% साठा; शेतकरी, सर्वसामान्य नागरिक चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 1:02 AM