शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Elections: अजित पवारांचा पहिला उमेदवार ठरला! फोनवरून नावाची केली घोषणा
2
"मिस्टर शिंदे, ठाकरेंवर बोलताना हे विसरू नका", 'त्या' ट्विटवरून राऊत भडकले
3
आचारसंहितेपूर्वी आरक्षण द्या,अन्यथा आगामी निवडणुकीत सरकारला पश्चाताप होईल: मनोज जरांगे
4
धक्कादायक! टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव, पगार कापण्याची धमकी; मॅनेजरने उचललं टोकाचं पाऊल
5
"सरकार म्हणजे विषकन्या, सबसिडीच्या भरवशावर राहू नका! लाडकी बहीण सुरू केल्यामुळे..."; नितीन गडकरींचं विधान चर्चेत
6
पोलिसांनी चौकशीला बोलावल्यानंतर Book My Showचे सीईओ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
7
स्वत:शीच लग्न करणाऱ्या जगप्रसिद्ध रिलस्टारने संपविले आयुष्य; चिठ्ठी सापडली
8
पहिल्यांदाच बोनस शेअर देण्याची तयारी; ६ महिन्यांत 'या' शेअरनं दुप्पट केला पैसा, तुमच्याकडे आहे का?
9
पितृपक्ष: सर्वपित्री अमावास्येला ‘असे’ करा श्राद्ध; पूर्वज होतील प्रसन्न, समाधानाने तृप्त!
10
दुसऱ्या लग्नातही सुख नाही, नव्या नवरीनं उचललं टोकाचं पाऊल; पती फोनवर असं काय बोलला?
11
सुपर कॅच! सिराज अगदी स्प्रिंगसारखा वाकला; शेवटच्या टप्प्यात शाकिबचा 'करेक्ट कार्यक्रम'
12
फिट राहा! २ वेळा भात खाल्ल्याने वजन वाढतं?; दिवसातून किती वेळा, किती प्रमाणात खावा, जाणून घ्या
13
IND vs BAN : 'हिटमॅन' रोहित झाला 'सुपरमॅन'; हवेत उडी मारुन एका हातात पकडला कॅच (VIDEO)
14
वर्षाताई बाहेर जायला हव्या होत्या! पॅडीच्या एक्झिटनंतर प्रेक्षक नाराज, म्हणाले- "बिग बॉस स्वत:च्या मनाने..."
15
SBI ची सुपरहिट स्कीम : एकदा करा डिपॉझिट, दर महिन्याला होईल कमाई; पाहा संपूर्ण डिटेल्स
16
नवरात्रोत्सव: १० राशींना नवदुर्गेचे वरदान, अकल्पनीय लाभ; धनलक्ष्मीची अपार कृपा, शुभच होईल!
17
लाडकी बहीण योजनेवर नितीन गडकरींचं एक विधान; सरकारची झाली कोंडी, विरोधकांनी घेरलं
18
"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट
19
पाकिस्तानला मोठा झटका! ६ मंत्रालयांना टाळे, दीड लाख नोकऱ्या गेल्या; आयएमएफकडून कर्जासाठी लोटांगण
20
Nepal Flood : पुराचे थैमान! नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर; १७० जणांचा मृत्यू, १११ जण जखमी, ४२ बेपत्ता

रोहनखेड येथे सहा एकरात केवळ ७५ किलो उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 4:22 AM

रोहनखेड: यंदा अतिपाऊस व ढगफुटी सदृश पावसामुळे अकोट तालुक्यातील खारपाणपट्ट्यात येत असलेल्या रोहनखेड परिसरात मूग उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फटका ...

रोहनखेड: यंदा अतिपाऊस व ढगफुटी सदृश पावसामुळे अकोट तालुक्यातील खारपाणपट्ट्यात येत असलेल्या रोहनखेड परिसरात मूग उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. येथील एका शेतकऱ्याला सहा एकरात केवळ ७५ किलोच उत्पादन झाले असून, शेतकऱ्याचा लागवडीचा खर्चही वसूल झाला नाही. त्यामुळे या भागात सर्व्हे करून पीक विम्याची मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

यंदा परिसरात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रातच पेरणी आटोपली. त्यानंतर पावसाने दडी दिल्याने पिके कोमेजण्याच्या मार्गावर होते. पावसाने दमदार हजेरी लावल्याने पुन्हा शेतात पिके बहरली होती. पिके फुलोरा अवस्थेत असताना धुवारीमुळे फूलझळ झाल्याने मुगाच्या पिकाला शेंगाच लागल्या नसल्याचे दिसून आले. तसेच वातावरणातील बदलांमुळे अज्ञात रोगांचा प्रादुर्भाव यामुळे रोहनखेड परिसरासह पुंडा, बांबर्डा, कुटासा, कवठा बु. या शिवारात मूग पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी कीटकनाशकाची महागडी फवारणी केली मात्र तरीही उपयोग झाला नसल्याचे चित्र आहे.

-------------------

मुगाला आले होते कोंब

रोहनखेडसह पुंडा, बांबर्डा, कुटासा, कवठा बु. शिवारातील शेतकऱ्यांनी यंदा मुगाला पसंती देत मोठ्या प्रमाणात पेरणी केली होती. मात्र अतिपावसामुळे या शिवारात मुगाला कोंब फुटल्याचे दिसून आले. काही शेतकऱ्यांनी जुलै महिन्यातच पिकावर ट्रॅक्टर फिरवला असल्याचे वास्तव आहे. सद्यस्थितीत मूग तोडणी आटोपली असून, अत्यल्प उत्पादन होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

---------------------------------

खर्च ४० हजार ; शेतकरी आर्थिक संकटात

येथील भुजंगराव जगतराव झामरे यांनी सहा एकरात मुगाची पेरणी केली. यासाठी त्यांना जवळपास ४० हजार रुपयांपर्यंत खर्च आला. मात्र उत्पादन केवळ ७५ किलोच झाल्याने शेतकऱ्याला मूग तोडणीची मजुरी घरून द्यावी लागली आहे. लागवडीचा खर्च सुद्धा वसूल झाला नसल्याने परिसरात मुगाचा सर्व्हे करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.