अकोला, दि. १0- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खनिकर्म विभागामार्फत शुक्रवारी राबविण्यात आलेल्या रेतीघाटांच्या ह्यऑनलाइनह्ण लिलाव प्रक्रियेत जिल्हय़ातील ७४ रेतीघाटांपैकी बोली लागलेल्या केवळ पाच रेतीघाटांचा लिलाव करण्यात आला. या पाच रेतीघाटांच्या लिलावातून ३३ लाख ४३ हजार ८५१ रुपयांचा महसूल प्राप्त झाला.जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत यावर्षी जिल्हय़ातील सातही तालुक्यांतील रेतीघाटांची लिलाव प्रक्रिया यापूर्वी तीनदा राबविण्यात आली. त्यामध्ये जिल्हय़ातील १0६ रेतीघाटांचा ऑनलाइन लिलाव करण्यात आला. उर्वरित ७४ रेती घाटांच्या ह्यऑनलाइनह्ण लिलावाची प्रक्रिया १0 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खनिकर्म विभागामार्फत राबविण्यात आली. या रेतीघाटांच्या लिलावातून १0 कोटी ५३ लाख ७ हजार ८१५ रुपयांचा महसूल प्राप्त होणे अपेक्षित होते; मात्र ऑनलाइन बोली लागलेल्या दोनद, राहित, डऊचका, हाता व टाकळी पोटे या पाच रेतीघाटांच्या लिलावातून जिल्हाधिकारी कार्यालयाला ३३ लाख ४३ हजार ८५१ रुपयांचा महसूल प्राप्त झाला.
जिल्हय़ातील केवळ पाच रेतीघाटांचा लिलाव
By admin | Published: February 11, 2017 2:38 AM