अकोला: शेतकऱ्यांना डोळ््यांसमोर ठेऊन सुजलाम-सुफलाम उपक्रम असो किंवा बालवयात लहान मुलांवर संस्कार रूजविण्यासाठी नुकतीच सुरू केलेली ‘मी आणि मूल्यवर्धना’ची चळवळ या दोन्ही उपक्रमात एकच साम्य आहे आणि ते म्हणजे लोकसहभाग. समाजहित समोर ठेऊन उभारलेली योजना किंवा उपक्रम पूर्णत्वास जाण्यासाठी तुम्हाला सर्वांच्या सहकार्याची गरज भासते. त्यावेळी आपण केलेल्या कामामुळे समाजावर दुरगामी सकारात्मक परिणाम होईल,याची जाण ठेवली म्हणजे झालं.सुजलाम-सुफलाम ही संकल्पना कधी सूचली?हवामान बदल, जमिनीची होणारी धुप आणि रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे शेती हा व्यवसाय संकटात सापडल्याची जाणीव झाली. जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी २००९ मध्ये धरण, तलावातील गाळ उपसण्याचे काम सुरु केले. तेव्हा पाच वर्ष मराठवाड्यात काम केले. त्यानंतर जिल्हा दुष्काळमुक्त कसा करता येईल, या विचारातून भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून सुजलाम-सुफलाम प्रकल्पाला मुर्त रूप देण्याचा प्रयत्न केला.जिल्ह्यातील कामे आटोपली का?अकोला जिल्ह्यात सहा महिन्यांपूर्वी कामाला सुरूवात केली. अद्याप बराच पल्ला गाठायचा आहे. जिल्ह्यात शक्य होईल तेवढे काम पूर्ण करू. काम बंद होणार नाही. ‘बीजेएस’सोबत नागरिकांनी संपर्क साधल्यास उत्साहाने कामे करता येतील. शासन आणि प्रशासन सोबतीला आहेच,यात दुमत नाही. नागरिकांनी भविष्याची चाहूल ओळखून उपक्रमात सहभागी होण्याची गरज आहे.‘मूल्यवर्धना’ची गरज का भासली?कोवळ््या वयातील मुलांवर चांगले संस्कार घातल्याशिवाय सशक्त पिढी निर्माण होऊ शकणार नाही. समाजातील परिस्थिती फार वाईट आहे. केवळ शाळकरी मुलेच नव्हे तर आई-वडील,शिक्षकांनी स्वत: ‘मूल्यवर्धना’चे धडे गिरवण्याची गरज आहे. जगण्यासाठी मूल्ये शिकवण्याची वेळ का आली,याचा सुज्ञ पालक, शिक्षकांनी अंतर्मुख होऊन विचार करावा.जिल्हा परिषदेच्या शाळाच का, खासगी का नाही?चिमुकल्या विद्यार्थ्यांवर मूल्यात्मक संस्कार व्हावेत,असा विचार मनात आला तेव्हा सर्वात प्रथम जिल्हा परिषद, महापालिक ा शाळेतील विद्यार्थी नजरेसमोर आले. शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात अनेक समस्या असतात. त्यांचा सामना करताना या चिमुकल्यांची व कुटुंबियांची प्रचंड फरफट होते. शासनाचे सहकार्य लक्षात घेता खासगी शाळांमध्येही उपक्रम सुरू करता येईल.तुमच्या कामाचे तुम्ही कसे मुल्यमापन करता?दोन वर्षांपासून बुलडाणा जिल्ह्यात कामाला सुरूवात केली. जिल्ह्यातील सर्व धरणे,तलाव पाण्याने भरले असून भूजल पातळीत वाढ झाली आहे. शेतकरी तीन-तीन पिके घ्यायला लागले. धरण,तलाव तसेच नदीतील गाळ शेतात टाकल्याने शेतीची सुपिकता वाढली. दुष्क ाळसदृष्य काही भागात विहीरींची पातळी इतकी वाढली की नागरिक हाताने पाण्याचा उपसा करतात. हा क्षण समाधानाचा मानला पाहिजे.