फोटो: राजराजेश्वर मंदिर
किती दिवस कळसाचेच दर्शन?
कोरोनामुळे होणारी गर्दी पाहता सर्व मंदिरे बंद आहे. निर्बंध शिथिल झाल्याने भगवंताच्या दर्शनाची आस लागली आहे. त्यामुळे दर्शनासाठी गेल्यानंतर मंदिराजवळ जाऊनही केवळ कळसाचेच दर्शन करून परतावे लागते.
- मंगेश ताठे, भाविक
भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मंदिरांची दरवाजे केव्हा उघडणार अशी आस लागली आहे. कोरोनाची लाट ओसरत असल्याने देवस्थाने उघडण्यात यावी, आणखी किती दिवस दूर दर्शन करावे लागणार आहे.
- अजय राऊत, भाविक
आर्थिक गणित कोलमडले !
शहरातील सर्व मंदिर बंद आहे. यासोबत लग्न सोहळे, कार्यक्रमही बंद असल्याने फुलाला मागणी नाही. आता निर्बंध शिथिल झाले आहे. त्यामुळे थोड्या प्रमाणात व्यवसाय होत आहे; परंतु मंदिरे बंद असल्याने सर्व व्यवसाय बुडाला.
- मुकेश विटकर, फूलविक्रेता
मंदिरात भाविक आल्यावर व्यवसायास चालना मिळते. दुकानात सर्व पूजा साहित्य असल्याने मंदिर उघडे राहणे आवश्यक आहे. मंदिर बंद असल्याने व्यवसाय केवळ १५ टक्क्यांवर आला आहे. अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
- मोहन अंबारखाने, पूजा साहित्य विक्रेता
मंदिरात गेल्याने आत्मबळ मिळते !
निर्बंध हटल्यानंतर भाविक मंदिरात दर्शनासाठी जात आहे. मंदिर बंद असल्याने त्यांना दूर दर्शन करून परतावे लागते. भाविकांची श्रद्धा पाहता लवकरात लवकर मंदिर खुलणे गरजेचे आहे. कोरोनाचे नियम पाळून सर्व उघडत असताना मंदिर सुद्धा उघडायला हवी, मनुष्याला मंदिरात गेल्याने आत्मबळ प्राप्त होते.
- पंडित रविकुमार शर्मा, पुजारी