अकोला : रोटरी क्लब आॅफ अकोला मिडटाऊनच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौरविलेल्या आणि १0३ तास योगा करून गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये विश्वविक्रम नोंदविणाऱ्या प्रज्ञा पाटील (नाशिक) यांच्या खुले योग मार्गदर्शन व प्रात्यक्षिक शिबिराचे ४ मार्च रोजी सकाळी ६ ते ८ वाजतापर्यंत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथे आयोजन करण्यात आले आहे.प्रज्ञा सुनील पाटील या नाशिकच्या राहणाऱ्या असून, योगा विषयात त्या निष्णात आहेत. त्या उद्योजिका आहेत, तसेच त्यांना योगाची प्रचंड आवड आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत त्यांनी अनेक सुवर्ण, रजत पदके पटकावली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या योगाशी निगडित आहेत. त्यांनी १0३ तास योगा करून विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. अकोलेकरांना खुले योग मार्गदर्शन प्रज्ञा पाटील करणार असून, योग प्रात्यक्षिकसुद्धा त्या करून दाखविणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात योग शिकण्याची संधी अकोलेकरांना चालून आली आहे. महिला व पुरुषांनी ४ मार्च रोजी शिबिरात सहभागी व्हावे, शिबिरात स्वत:ची सतरंजी, चटई सोबत आणावी, असे प्रकल्प प्रमुख पीयूष मित्तल, अॅड. मनोज अग्रवाल यांनी कळविले
रोटरी क्लब अकोला मिडटाऊनतर्फे खुले योग मार्गदर्शन, प्रात्यक्षिक शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 3:55 PM
अकोला : रोटरी क्लब आॅफ अकोला मिडटाऊनच्यावतीने प्रज्ञा पाटील (नाशिक) यांच्या खुले योग मार्गदर्शन व प्रात्यक्षिक शिबिराचे ४ मार्च रोजी सकाळी ६ ते ८ वाजतापर्यंत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथे आयोजन करण्यात आले आहे.
ठळक मुद्देप्रज्ञा सुनील पाटील या नाशिकच्या राहणाऱ्या असून, योगा विषयात त्या निष्णात आहेत. . गेल्या अनेक वर्षांपासून त्या योगाशी निगडित आहेत. त्यांनी १0३ तास योगा करून विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. अकोलेकरांना खुले योग मार्गदर्शन प्रज्ञा पाटील करणार असून, योग प्रात्यक्षिकसुद्धा त्या करून दाखविणार आहेत.