शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
3
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
4
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
5
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
6
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
7
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
8
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
10
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
11
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
12
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
13
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
14
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
16
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
17
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
18
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
19
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
20
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र

चोहोट्टा येथील विद्यार्थ्यांचे शिक्षण उघड्यावर

By ram.deshpande | Published: July 25, 2017 9:01 PM

चोहोट्टा बाजार : येथील उर्दू शाळेमध्ये वर्गखोल्यांची संख्या कमी असल्याने शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना उघड्यावर शिकविण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे व्यवस्थापन समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देउर्दू शाळेचे वर्ग आठ; खोल्या मात्र सहा

लोकमत न्यूज नेटवर्कचोहोट्टा बाजार : येथील उर्दू शाळेमध्ये वर्गखोल्यांची संख्या कमी असल्याने शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना उघड्यावर शिकविण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे व्यवस्थापन समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.चोहोट्टा बाजार येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेमध्ये एकूण आठ वर्ग आहेत आणि प्रत्येक वर्गात भरगच्च विद्यार्थी संख्या आहे; परंतु वर्ग आठच्या तुलनेत खोल्या सहाच असल्याने मागील काही वर्षांपासून दोन खोल्यांची कमतरता भासत आहे. त्यामुळे या दोन वर्गाच्या विद्यार्थ्यांना कधी उघड्यावर शिकविण्यात येते तर कधी एकाच वर्गात दोन वर्गांचे विद्यार्थी बसवावे लागतात; परंतु या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगलाच गोंधळ उडताना दिसून येतो. एका वर्गात दोन वर्गांचे विद्यार्थी बसवावे लागत असल्यामुळे त्यांच्या शिक्षणावरसुद्धा परिणाम होत आहे. सद्यस्थितीत एका वर्गासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून शाळेतील खोलीचा उपयोग करण्यात येत आहे. उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने उर्दू शाळेसाठी दोन वाढीव वर्गखोल्यांची सुविधा जिल्हा परिषद प्रशासनाने करून देण्याची मागणी उर्दू शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नाजीम कुरेशी, उपाध्यक्ष शे. शरीफ यांच्यासह समितीच्या पदाधिकाºयांनी केली आहे.एका खोलीत दोन वर्ग भरवावे लागत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. जि.प. प्रशासनाने या बाबीची दखल घेऊन दोन खोल्यांची सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.- नाजीम कुरेशी,अध्यक्ष, उर्दू शाळा समिती, चोहोट्टा बाजार.