शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
4
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
5
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
6
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
7
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
8
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
9
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
10
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
11
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
12
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
13
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
14
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
15
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
16
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
17
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
18
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
19
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
20
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण

‘ऑपरेशन मुस्कान’ने ३६ मुलांचा शोध

By admin | Published: July 06, 2015 1:32 AM

बेपत्ता, घर सोडलेल्या मुलांच्या शोधासाठी अकोला जिल्ह्यात ३६ कर्मचा-यांचा ताफा.

अकोला - आई-वडिलांच्या छत्रापासून दुरावलेल्या.. खेळण्या बागळण्याच्या वयात भिकेला लावलेल्या.. बेवारस म्हणून जीवन कंठीत असलेल्या.. आणि कोवळया वयातच चेहर्‍यावरील हास्य हरविलेल्या मुलांच्या चेहर्‍यावर स्मित फुलणार आहे. राज्याच्या गृह खात्यामार्फत यासाठी ऑपरेशन मुस्कान राबविण्यात येत असून, जिल्हय़ात ३ दिवसांमध्येच या ऑपरेशनमुळे ३६ मुलांचा शोध घेण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या मार्गदर्शनात जिल्हय़ातील ६ पोलीस अधिकार्‍यांसह ३६ कर्मचारी रात्रं-दिवस मुलांचा शोध घेत असून, त्याचेच फलित म्हणून बेवारस मुलांच्या चेहर्‍यावर ह्यमुस्कानह्ण फुलविण्याचे काम जिल्हय़ाच्या पोलीस खात्याने केले आहे.राज्यात दहशतवादी कारवायांमध्ये लहान मुलांचा वापर करण्यात येत असल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाच्या निदर्शनास आले असून, यामध्ये बेवारस, बेपत्ता, रागात घर सोडून गेलेल्या मुलांचा मोठय़ा प्रमाणात वापर करण्यात येत आहे. त्यामुळे या मुलांचा शोध घेऊन त्यांना आई-वडील, नातेवाईक तसेच महिला व बालकल्याण समितीच्या ताब्यात देण्यासाठी प्रत्येक जिल्हय़ात १ ते ३१ जुलै या कालावधीत ऑपरेशन मुस्कान राबविण्यात येत आहे.या ऑपरेशनमध्ये बेपत्ता झालेले, हरवलेले, रागात घर सोडून गेलेल्या आणि बेवारस असलेल्या ६ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांचा शोध घेण्यात येत असून, केवळ ३ दिवसांतच अकोला पोलीस दलाने ३६ मुलांचा शोध घेतला आहे. यापैकी २७ मुलांना आई-वडील व नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून, ९ मुलांना बालकल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आले आहे. या ३६ मुलांपैकी १३ मुलींचाही शोध ऑपरेशन मुस्कानमध्ये घेण्यात आला असून, ३ मुली बालकल्याण समितीच्या ताब्यात, तर उर्वरित १0 मुलींना त्यांचे आई-वडील व नातेवाईकांकडे सोपविण्यात अकोला पोलीस विभागाला यश आले आहे. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या या ऑपरेशनचा रोजचा अहवाल घेण्यात येत असून, तो पुणे येथे गुन्हे अन्वेषण विभागाकडे पाठविण्यात येत आहे.या पथकातील कर्मचार्‍यांना पोलीस अधीक्षक मीणा व अतिरिक्त पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील रोज सायंकाळी मार्गदर्शन करीत आहेत. त्यामुळेच हे अभियान जिल्हय़ात बर्‍याच प्रमाणात यशस्वी झाले आहे.