शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

सत्तेत असताना विरोधकांनी तिजो-यांचे सिंचन केले, मुख्यमंत्र्यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2017 5:06 PM

सिंचनासाठी प्रकल्प प्रस्तावित झाले, याप्रकल्पांचे कामही सुरू झाले परंतू मागील सरकारने या प्रकल्पांना निधी दिला नाही. त्यांनी केवळ त्यांच्या तिजो-यांच्या सिंचन केले असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

अकोला -

विदभार्तील शेतकरी आत्महत्यांचे मुळे हे सिंचनाच्या कमतरतेमध्ये आहे. सिंचनासाठी प्रकल्प प्रस्तावित झाले, याप्रकल्पांचे कामही सुरू झाले परंतू मागील सरकारने या प्रकल्पांना निधी दिला नाही. त्यांनी केवळ त्यांच्या तिजो-यांचे सिंचन केले असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.प्रकल्पासाठी निधी कमी पडणार नाही -गडकरी

सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून हरित क्रांती होईल. शेतकºयाच्या बांधापर्यंत पाणी दिल्या जाईल त्यामुळे हे प्रकल्प वेळत पूर्ण करा, निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. येणाºया काळात सिचंन प्रकल्पातून कालव्याद्वारे नव्हे तर जलवाहिनी द्वारे पाणी दिले जाईल त्यामुळे पाण्याचा वापर तिपटीने वाढेल असा दावा त्यांनी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूतल परिवहन तथा जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते गांधीग्राम येथे आयोजित समारंभात बळीराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत जिल्ह्यातील ११ सिंचन प्रकल्पांच्या कामांचा प्रारंभ रविवारी झाला त्या वेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, विदभार्तील सिंचन प्रकल्पांसाठी तब्बल २० हजार कोटीची गरज होती. या निधीचा प्रस्ताव आम्ही पंतप्रधानांकडे दिल्यावर नितीनजी गडकरी यांनी एका दिवसात त्याचा पाठपुरावा केला म्हणून हा निधी उपलब्ध होऊ शकला. येणाºया कालावधीत या निधीचा पुर्ण विनियोग करून सर्व प्रकल्पांच्या माध्यमातून सिंचनाची व्यवस्था शेतकºयांना दिली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. सिंचन प्रकल्प पुर्ण करण्याची इच्छाशक्ती विरोधकांमध्ये नव्हती त्यांनी केवळ भ्रष्टाचार केला असा आरोप त्यांनी केला. यावेळी मंचावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर, अकोल्याचे पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील, जिल्हापरिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार बळीराम सिरस्कार, आ.हरिष पिंपळे, आ. रणधीर सावकर, महापौर विजय अग्रवाल, आदी उपस्थित होते. 

कर्जमाफीमध्ये विदर्भाला ७ हजार ५०० कोटी 

काँग्रेसने सन २००८मध्ये दिलेली कर्जमाफी ही केवळ ६ हजार कोटीची होती व त्यामध्ये विदभार्ला फक्त १५०० कोटी मिळाले मात्र भाजपा सरकारने दिलेल्या कर्जमाफीमध्ये विदभार्तील शेतकºयांना तब्ब ल ७ हजार ५०० कोटी दिले आहेत. शेवटच्या शेतकºयांचे कर्ज माफ होईपर्यंत ही योजना सुरू राहिल असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. सभेपुर्वी शेतकरी जागर मंच, शेतकरी संघटना तसेच शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी स्थानबद्ध करण्यात आले होते. सभा संपल्यावर त्यांना सोडून देण्यात आले.  

शिवसेना कार्यकर्ते उधळनार होते मुख्यमंत्र्यांची सभागांधीग्राम येथे.मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री गडकरी  साहेब यांचा कार्यक्रम दरम्यान बोन्ड अळी सोयाबीन ,मुंग, उडीद ,कापूस या पिकाचे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झालेल्या असताना सरकार उद्घाटन करून फक्त जनतेची दिशाभूल करत आहेत याचा निषेध करण्याकरिता शिवसेनेचा वतीने आजची सभा उधडण्यासाठी आंदोलन करण्यात येत असताना गांधीग्राम येथे शिवसेनेचे कार्यकर्ते मुकेश निचळ, रोषण पर्वतकर, बजरंग गोतमरे, कार्तिक गावंडे ,संतोष जगताप, शंकर यादव नितीन गोलम यांना सभे दरम्यान घोषणा देताना , सोयाबीन फेकताना, बोन्ड अंडी दाखवून निषेध करतांना अटक करण्यात आली

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा