आकोट (अकोला): आकोट विधानसभा मतदारसंघातील निवडणूक लढविणार्या उमेदवारांच्या खर्चाचे विवरण तपासून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे न ठेवणे व त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी गैरहजर राहून निवडणूक कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन अधिकार्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश हिंगे यांनी पथकप्रमुख एस.एस. धुर्वे यांना दिले आहेत. पं. स. चे कनिष्ठ लेखाधिकारी व विस्तार अधिकारी या दोघांना याबाबत कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. त्यांच्या स्पष्टीकरणानंतर लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ मधील कलम १३४ अंतर्गत त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दोन अधिका-यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश
By admin | Published: October 10, 2014 1:16 AM