अकोला: महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विकास कामे करणार्या कंत्राटदारांचे १५ लक्ष रुपयांचे देयक थकीत ठेवल्याप्रकरणी मनपाची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी दिले. यासंदर्भात मनपा प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कंत्राटदार राजनाथसिंग व जगन्नाथ कुमार सिंग यांनी विकास कामे केली. दोन्ही कामाच्या बदल्यात संबंधित विभागाने ६ लक्ष व ९ लक्ष रुपयांचे देयक अदा करणे भाग होते; परंतु देयक थकीत असल्यामुळे दोन्ही कंत्राटदारांनी स्थानिक न्यायालयात धाव घेऊन अर्ज दाखल केला. यासंदर्भात न्यायालयाने महापालिकेच्या मालमत्ता जप्तीचे आदेश जारी केले. उद्या बुधवारी यासंदर्भात मनपाकडून ठोस निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अकोला मनपाच्या मालमत्ता जप्तीचा आदेश
By admin | Published: September 30, 2015 2:06 AM