३१ विद्यार्थ्यांना देणार प्रवेश; मागील तीन-चार वर्षांपासून होता बंदअकोला : सेंद्रिय शेतीचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सेंद्रिय शेती प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला होता; परंतु निधी उपलब्ध झाला नसल्याने या अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष झाले आहे. यावर्षी मात्र राज्यातील पहिला सेंद्रिय शेती पदविका अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्यात येत असल्याचे वृत्त आहे. सर्वच पिकांमध्ये कीटकनाशक रसायनांचा वाढलेला वापर मानवी आरोग्याला घातक ठरत आहे. हा वापर कमी करण्यासाठी विविध पातळीवरू न शेतकर्यांचे प्रबोधन करण्यात येत आहे. असे असले, तरी रसायनांचा वापर कमी न होताच वाढला आहे. या पृष्ठभूमीवर शेतकर्यांना कृतीतून सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण व या माध्यमातून या विषयाची आवड निर्माण होण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सेंद्रिय शेती (पदविका) प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. येथून प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या विद्यार्थी, शेतकर्यांनी सेंद्रिय पिके घेणे सुरू केले असून, यावर आधारित उद्योग सुरू केले आहे; परंतु निधीच उपलब्ध होत नसल्याने हा अभ्यासक्रम बंद पडण्याची स्थिती निर्माण झाली. या परिस्थितीत कृषी विद्यापीठाने कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्राच्या विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणे सुरू ठेवले; परंतु शेतकर्यांना शिक्षण देणे हा या अभ्यासक्रमाचा मूळ उद्देश आहे. त्यामुळे कृषी विद्यापीठाने अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. ३0 विद्यार्थी प्रवेश क्षमता असलेला हा अभ्यासक्रम यावर्षी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. - अभ्यासक्रम आहे बंद राज्यातील पहिला सेंद्रिय पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला होता; पण मागील तीन ते चार वर्षांपासून तो बंद पडला आहे. यावर्षी पुन्हा हा अभ्यासक्रम सुरू होणार असल्याने सेंद्रिय शेतीची आवड असलेल्या शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.- सेंद्रिय शेतीचे शेतकर्यांना शिक्षण देण्यासाठी सेंद्रिय शेती पदविका अभ्यासक्रम सुरू केला आहे; परंतु निधी नसल्याने शेतकर्यांना शिक्षण देता आले नाही; मात्र कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. यावर्षी पुन्हा पदविका अभ्यासक्र म सुरू करण्यात येणार आहे.- डॉ. व्ही.एम. भाले,अधिष्ठाता (कृषी),डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.
सेंद्रिय शेती पदविका अभ्यासक्रम पुन्हा सुरू होणार!
By admin | Published: June 25, 2017 1:52 PM