शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

सेंद्रिय शेतीला प्रत्यक्ष कृतीतून चालना !

By admin | Published: July 06, 2014 7:52 PM

६८ शेतकर्‍यांनी घेतली सेंद्रिय शेती पदविका , दज्रेदार पिके, पदार्थांंची निर्मिती

अकोला : सेंद्रिय शेतीचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सेंद्रिय शेती प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. आतापर्यंत ६८ शेतकर्‍यांनी येथून सेंद्रिय शेती प्रशिक्षण प्रमाणपत्र (पदविका) प्राप्त केले असून, त्यांनी दज्रेदार सेंद्रिय पिके व पदार्थ निर्मितीला सुरुवात केली आहे.पीक पद्धतीमध्ये वेगवेगळी रसायनं, कीटकनाशकांचा वाढता वापर मानवी आरोग्याला घातक ठरू लागला आहे. हा वापर कमी करण्यासाठी विविध पातळीवर शेतकर्‍यांचे प्रबोधन करण्यात येत आहे. असे असले तरी, रसायनांचा वापर वाढतच आहे. या पृष्ठभूमिवर शेतकर्‍यांना प्रत्यक्ष कृतीतून सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण व या माध्यमातून त्यांच्यात याविषयी आवड निर्माण होण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सेंद्रिय शेती (पदविका) प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. येथून प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या विद्यार्थी, शेतकर्‍यांनी सेंद्रिय पिकं घेणे सुरू केले असून, त्यावर आधारित उद्योगही सुरू केले आहेत.सेंद्रिय शेती पदविका अभ्यासक्रमासह सेंद्रिय शेती प्रशिक्षण वर्गावरही भर देण्यात येत आहे. अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि केंद्र सरकारच्या नागपूर विभागीय सेंद्रिय शेती केंद्राच्यावतीने विदर्भातील शेतकर्‍यांसाठी सेंद्रिय शेती प्रशिक्षण वर्गाचे आयोजन नुकतेच केले होते. सेंद्रिय उत्पादनांना उपलब्ध असलेली आंतराष्ट्रीय बाजारपेठ लक्षात घेता, भारतीय सेंद्रिय उत्पादनांना मोठा वाव आहे. राज्य सरकारने सेंद्रिय शेती प्रोत्साहन योजनेद्वारे सेंद्रिय शेतीला पाठबळ दिले आहे; मात्र या शेतीचा प्रसार गतीने होण्यासाठी, शेतकर्‍यांना प्रत्यक्ष कृतीतून सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण दिल्याशिवाय गत्यंतर नाही. यासाठीच सेंद्रिय शेतीवर नव्याने भर देण्यात येत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण घेणारी तिसरी तुकडी बाहेर पडली आहे. या अभ्यासक्रमाद्वारे विदर्भात प्रशिक्षित शेतकरी तयार केले जात आहेत. अकोला जिल्हय़ातील शेतकर्‍यांनी या माध्यमातून स्वत:चे उद्योगही सुरू केले आहेत. यात तेल्हारा तालुक्यातील काही महिला शेतकर्‍यांचाही समावेश आहे.