लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: निसर्ग शिक्षण कार्यसंस्था व बाल शिवाजी शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने जठारपेठ येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात २१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत भूगोल प्रदर्शन-२0१८ चे आयोजन केले आहे. २१ फेब्रुवारीला अण्णासाहेब देव यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचा आरंभ होईल. प्रत्येक दिवशी सकाळी ९, ११ व दुपारी १ व ३ वाजता असे चार शो घेण्यात येतील. प्रत्येक कार्यक्रम हा दीड तासाचा राहील. गोल-गोल वाटणारा भूगोल अधिक गोड वाटावा, अनेक साध्या परंतु दुर्मीळ बाबी जनसामान्यांपर्यंत सहजरीत्या पोहचाव्यात, यासाठीच प्रदर्शनाचे आयोजन केले असल्याची माहिती निसर्ग अभ्यास केंद्र संचालक प्रभाकर दोड यांनी दिली.
अकोल्यात २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान 'भूगोल प्रदर्शन-२0१८'चे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 2:27 AM