प्राध्यापक आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी मानकर
अकाेला : संभाजी ब्रिगेडच्या प्राध्यापक आघाडीचे गठन करण्यात आले असून, या आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी प्रा. विनाेद मानकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव साैरभ खेडकर, डाॅ. गजानन पारधी, अशाेकराव पटाेकार, जिल्हाध्यक्ष प्रशांत भारसाकळ यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले.
काैलखेड चाैकात अतिक्रमण
अकाेला : अकाेला बार्शीटाकळी राेडवरील काैलखेड चाैक येथे माेठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे; मात्र मनपाच्या अग्निशमन विभागाने हे अतिक्रमण काढण्याकडे दुर्लक्ष केले आहे. महापालिकेने लक्ष घालून हे अतिक्रमण काढण्याची मागणी करण्यात आली आहे.
अवैध धंदे जाेरात
अकाेला : सध्या शहरासह जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढले आहेत. प्रचंड हप्तेखाेरी सुरू असल्याने अवैध धंद्यांना परवानाच मिळाल्याचे चित्र सध्या शहरात आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही माेठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून, याकडे पाेलीस प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष आहे.
गुटखा माफियांचा हैदाेस
अकाेला : शहरासह जिल्ह्यात गुटखामाफिया माेठ्या प्रमाणात वाढले आहेत. अकाेटफैल परिसरात तसेच शहराच्या मुख्य बाजारपेठेत या गुटखा माफियांचा हैदाेस आहे. शहरातील एका बड्या गुटखा माफियाने तर वरिष्ठ स्तरावरच फिल्डींग लावत गाैरखधंदा जाेरात सुरू केल्याची चर्चा आहे.
चाेरटे अटकेत
अकाेला : एमआयडीसी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतून बॅग चाेरी करणाऱ्या दाेन चाेरट्यांना एमआयडीसी पाेलिसांनी अटक केली. त्यांनी बॅग चाेरीची कबुली दिली असून, या चाेरट्यांना शनिवारी न्यायालयासमाेर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली.