अकोला : अकोला-बुलडाणा जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनतर्फे अकोला शहरात १४ ते १६ नोव्हेंबरदरम्यान खंडेलवाल भवन येथे विदर्भस्तरीय छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. याप्रसंगी उत्कृष्ट छायाचित्रांसाठी पुरस्कृत केले जाणार आहे. प्रदर्शनाची विभागणी दोन गटांत करण्यात आली असून, पहिल्या गटात व्यावसायिक छायाचित्रकारांसाठी ह्यभारतीय सण, उत्सवह्ण हा विषय ठेवण्यात आला असल्याची माहिती गुरुवारी पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष जगदीश झुनझुनवाला यांनी दिली. दुसर्या गटात हौशी छायाचित्रकारांचा समावेश राहील. यात ह्यनिसर्ग चित्रणह्ण हा विषय ठेवण्यात आला आहे. या प्रदर्शनात सहभागी होणार्या छायाचित्रकारांसाठी स्पर्धा ठेवण्यात आली असून, रोख पुरस्कार दिले जाणार आहेत. उत्कृष्ट प्रवेशिका पाठविणार्या १५ स्पर्धकांनासुद्धा गिफ्ट व्हाउचर दिले जाईल. या प्रदर्शनात संजय आगाशे आणि जगदीश झुनझुनवाला यांनी अलाहाबाद आणि हरिद्वार येथे काढलेल्या कुंभमेळ्यातील विशेष छायाचित्रांचे दालनदेखील राहणार आहे. सकाळी १0 ते रात्री ९ या वेळेत हे नि:शुल्क प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहील. विविध कॅमेरा कंपनी व छायाचित्रीकरणासंबंधी साहित्याचे स्टॉलसुद्धा राहतील. स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता खंडेवाल भवन येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती स्पर्धा प्रमुख संजय आगाशे, अरविंद मानकर, सचिव किशोर पिंपळे यांनी दिली.
अकोला येथे तीन दिवसीय छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन
By admin | Published: November 06, 2014 11:02 PM