पिंपळखुटा गणामध्ये येणाऱ्या चान्नी,चांगेफळ,वाहाळा,बु.व पिंपळखुटा येथील सरपंच, उपसरपंच या कार्यशाळेला हजर होते. अभियाना अंतर्गत सन २०२१-२०२२ या वर्षामध्ये १५ व्या वित्त आयोगामधून ग्रामपंचायत विकास आराखडे तयार करून त्यामध्ये शिक्षण,आरोग्य,उपजीविका व मागासवर्गीयाचे कल्याण या बाबत ग्रामविकास विभागाचे शासन निर्णय व यशदा यांचे मार्गदर्शक तत्वे तथा ग्रामस्थाच्या मूलभूत गरजा विचारात घेऊन सदर निधीचे नियोजन करण्याचे सांगण्यात आले. या कार्यक्रमाला पंचायत समितीचे अधीक्षक उल्हास घुले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन पिंपळखुटाचे नवनिर्वाचित सरपंचा अलका वाहोकार ह्या होत्या तर प्रमुख उपस्थिती चान्नी सरपंच चंद्रकांत तायडे,शिरपूर,चांगेफळचे सरपंच आसिफ खाँ,वाहाळा बु,चे सरपंच परशराम भोकरे हे होते.या वेळी सूत्रसंचालन ग्रामसेवक एस,डी,ताले यांनी केले तर प्रास्ताविक ग्रामसेवक आर. के. बोचरे मांडले तर आभार सुभाष वाहोकार यानी मानले. कार्यक्रम यशस्वीसाठी आँपरेटर धम्मपाल वानखडे, बंड चान्नी, ग्रा. पं. कर्मचारी विजय वानखडे, शाम झाडोकार,डिगांबर माडोकार यांनी परिश्रम घेतले.
पं,स पातुर अंतर्गत पिंपळखुटा येथे आमचं गाव, आमचा विकास या कार्यशाळेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 4:52 AM