शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

अस्थी विसर्जन थांबवले!

By admin | Published: June 24, 2017 5:50 AM

कुटुंबातील सदस्यांचा निर्णय : शासनाने दखल घेण्याची ग्रामस्थांची मागणी.

संतोषकुमार गवई । लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला : कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या किसन दगडू बळकार या ५८ वर्षीय शेतकर्‍याचा हृदयविकाराच्या धक्क्याने २२ जून रोजी दुपारी १२ वाजता अचानक मृत्यू झाला. ही आत्महत्या नसली, तरी शेतकर्‍यांवर कर्जाचा किती ताण आहे, हे यानिमित्ताने स्पष्टपणे समोर आले आहे. त्यामुळे शासनाने या शेतकर्‍याच्या निधनाची तत्काळ दखल घेऊन सदर शेतकरी कुटुंबाला मदत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शोकमग्न कुटुंबाने मयत शेतकर्‍याच्या अस्थीचे विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला आहे. शिर्ला येथील शेतकरी किसन दगडू बळकार (५८) हे पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असलेल्या मुलाला पैसे पाठविण्यासाठी तजवीज करण्यासाठी गुरुवारी दुपारी १२ वाजता दुकानदार भीमराव ढाळे यांच्याकडे गेले होते. सदर दुकानदाराने पाच हजार रुपयांची मदत केली. तथापि, गतवर्षीचे ५0 हजार रुपयांचे थकीत पीक कर्ज, सावकाराकडून घेऊन थकीत असलेले कर्ज, पेरणीसाठी जवळ पैसा नसणे, गतवर्षी सोयाबीनची कवडीमोल भावाने केलेली विक्री, यामुळे ते प्रचंड आर्थिक विवंचनेत होते. त्यांच्या शेतात गतवर्षी पाच क्विंटल सोयाबीन पिकले होते. ते कवडीमोल भावाने विकले गेले. त्यानंतर पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी गुजरात राज्यात स्थलांतर केले होते. तेथे उसाच्या रसवंतीचा दांडा ओढून परिवाराची गुजराण केली. पावसाळा तोंडावर आल्याने ते पेरणीसाठी कुटुंबासह गावी परतले होते; परंतु काही दिवसांपासून पावसानेही दांडी मारल्याने ते चिंताग्रस्त झाले होते. या विविध विवंचनेत किसन बळकार यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सायंकाळी ५ वाजता शिर्ला येथे सुवर्ण नदीच्या काठावर अंत्यसंस्कार करण्यात आले.विदर्भातील प्रथेप्रमाणे अंत्यसंस्काराच्या दुसर्‍या दिवशी शुक्रवारी सकाळी ९ वाजता सुवर्ण नदीकाठावर अस्थी संकलित करण्यासाठी नातेवाईक एकत्रित आले होते. त्या सर्वांनी शासनाप्रति रोष व्यक्त केला आहे. कर्जमाफीचा निर्णय तत्काळ लागू झाला असता, तर कदाचित शेतकरी बळकार यांचे प्राण वाचू शकले असते, अशी भावना ग्रामस्थांची आहे. मयत शेतकरी किसन दगडू बळकार यांच्या पश्‍चात पत्नी वच्छलाबाई किसन बळकार यांच्यावर जबाबदारी आली आहे. कुटुंबावर असलेल्या कर्जाचे ओझे तसेच मुलांच्या शिक्षणाचा खर्च त्याबरोबरच पेरायची राहलेली शेती त्यासाठी नसलेला पैसा या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी शासनाने मदत करण्याची नितांत गरज आहे. तहसीलदारांनी दिले मदतीचे आश्‍वासनआर्थिक तणावामुळे शेतकरी गतप्राण झाल्याचे वृत्त ह्यलोकमतह्णने प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत पातूरचे तहसीलदार डॉ.आर.जी. पुरी यांनी गतप्राण झालेल्या शेतकर्‍याच्या कुटुंबाला शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. डॉ. पुरी यांनी शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता शिर्ला येथे भेट देऊन बळकार कुटुंबीयांचे सांत्वन केले, तसेच शासन स्तरावर बळकार यांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाईल. शासनामार्फत दिली जाणारी मदत शक्य तेवढय़ा लवकर दिली जाईल, तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमाला बळकार यांच्या मुलांना प्रवेश दिला जाईल, असेही डॉ. पुरी यांनी यावेळी सांगितले.