अकोला : प्रशासन आणि लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेमुळे मोर्णा नदीला गतवैभव प्राप्त झाले आहे. लोकसहभागातून झालेले काम कौतुकास्पद असून, इतर जिल्ह्यांनी या मोहीमेचा आदर्श घेऊन नद्यांची स्वच्छता करावी, असे आवाहन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी शनिवारी येथे केले.लोकसहभागातून मोर्णा नदीचा झालेला कायापालट पाहून भारावून गेलेल्या अहीर यांनी पालकमंत्री व सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन, मनपा प्रशासनासह संपूर्ण अकोलेकरांचे कौतुक करुन त्यांचे अभिनंदन केले.गवळी समाजाच्या सामुहिक विवाह सोहळयानिमित्त हंसराजअहीर शनिवारी शहरात आले होते. या निमित्ताने त्यांनी मोर्णा नदीला भेट देण्याचा मनोदय व्यक्त केला. गणेश घाट व अनिकट परिसरातून वाहणाऱ्या मोर्णा नदी काठाची त्यांनी पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, माजी आमदार जगनाथ ढोणे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, तहसिलदार राजेश्वर हांडे, सामाजिक कार्यकर्ते प्रदिप गुरुखुद्दे, खदान पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष महल्ले उपस्थित होते.जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून मोर्णा नदी स्वच्छता मोहिम कशा प्रकारे यशस्वीरित्या राबविण्यात आली याची सविस्तर माहिती याप्रसंगी प्रा. खडसे यांनी मंत्री महोदयांना दिली.यावेळी अहीर म्हणाले की, लोकसहभागातून मोर्णा नदी स्वच्छतेचे झालेले काम खरोखरच कौतुकास्पद आहे. स्वत: पंतप्रधानांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमातून या माहिमेची दखल घेतली. या मोहिमेमुळे मोणार्ला गत वैभव प्राप्त झाले आहे. या मोहिमेचा आदर्श इतर जिल्हायांनीही आदर्श घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मोर्णा स्वच्छता मोहिमेला जनता तसेच पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, संस्था यांनी दिलेल्या उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही अहीर यांनी केले.
मोर्णा स्वच्छता मोहिमेचा आदर्श इतर जिल्ह्यांनीही घ्यावा! - हंसराज अहीर यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 6:55 PM
लोकसहभागातून झालेले काम कौतुकास्पद असून, इतर जिल्ह्यांनी या मोहीमेचा आदर्श घेऊन नद्यांची स्वच्छता करावी, असे आवाहन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी शनिवारी येथे केले.
ठळक मुद्देगवळी समाजाच्या सामुहिक विवाह सोहळयानिमित्त हंसराजअहीर शनिवारी शहरात आले होते.मोर्णा नदीला भेट देण्याचा मनोदय व्यक्त केला. गणेश घाट व अनिकट परिसरातून वाहणाऱ्या मोर्णा नदी काठाची त्यांनी पाहणी केली. मोर्णा नदी स्वच्छता मोहिम कशा प्रकारे यशस्वीरित्या राबविण्यात आली याची माहितीप्रा. खडसे यांनी दिली.