पांढूर्णा : पातूर तालुक्यातील पांढुर्णा परिसरात गुरांमध्ये तोंडखुरी आजाराचा प्रादुर्भाव वाढला असल्याने पशुपालक चिंतित सापडले आहे. पशुपालकांनी एफएमडी लस टोचण्याचे आवाहन आलेगाव पशुसंवर्धन विभागामार्फत केले आहे.
पातूर तालुक्यातील पांढुर्णा, पिंपळडोळी, सोनुना, चोंढी, आंधारसांगवी, नवेगाव, जांभ, उमरवाडी, चारमोळी, आलेगाव परिसरात गुरांमध्ये तोंडखुरी आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे पशुपालक चिंतित सापडले आहेत. तोंडखुरीमुळे गुरांना चारा खाता येत नाही. आलेगाव पशुसंवर्धन विभागामार्फत पाांढुर्णासह परिसरामधे एफएमडी लस टोचण्यात येणार आहे. त्यामुळे जांभ, उमरवाडी, चारमोळी, घोटमाळ, आलेगाव परिसरातील सर्व पशुपालकांनी लस आपल्या गुरांना टोचून घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे. गावांमध्ये सर्व गुरांना मोफत टॅग लावण्यात येणार असून, यामुळे कोणत्याही आपत्तीमुळे अथवा जंगली जनावरांना गावातील गुरांची शिकार केल्यास विमा सुद्धा काढण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील पशुपालकांनी लस व गुरांचा विमा काढून घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.