अकोला : महावितरणमध्ये कार्यरत बाह्यस्त्रोत कर्मचाºयांना मासिक वेतन निर्धारित वेळेत मिळावे यासाठी सर्व संबंधितांनी विविध अधिनियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश महावितरणचे संचालक (वित्त) सुनिल पिंपळखुटे यांनी दिले आहेत. या कामात हयगय करणाº्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यामुळे बाह्यस्त्रोत कर्मचाºयांना यापुढे निर्धारित वेळेवरच मासिक वेतन मिळणार आहे.महावितरणच्या राज्यभरातील कार्यालयांमध्ये बाह्यस्त्रोत कर्मचारी आहेत. यामध्ये प्रामुख्याने सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे. या कर्मचाºयांना वेळेवर वेतन अदा केले जात नसल्यामुळे त्यांच्यात नाराजीचा सूर उमटत असून, याबाबत अनेक तक्रारीही समोर आल्या आहेत. या पृष्ठभूमीवर बाह्यस्त्रोत कर्मचाºयांच्या विविध प्रश्नांबाबत बुधवारी महावितरणच्या प्रकाशगड मुख्यालयात बैठक झाली. या बैठकीत बाह्यस्त्रोत कर्मचाºयांना मासिक वेतन निर्धारित वेळेत मिळावे यासाठी या प्रक्रियेशी निगडीत सर्व संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी. ही सर्व कामे आॅनलाईन प्रक्रियेद्वारेच वेळेत पूर्ण करावीत. तसेच याकरिता प्रत्येक विभागाने करावयाच्या कामाची जबाबदारी निश्चित करून या प्रक्रियेत अधिक सूसत्रता व गती आणावी, असे निर्देश संचालक (वित्त) सुनिल पिंपळखुटे यांनी यावेळी दिले.अकोला मंडळात २६० बाह्यस्त्रोत कर्मचारीमहावितरणच्या अकोला परिमंडळाअंतर्गत येणाºया अकोला मंडळात जवळपास २६० बाह्यस्त्रोत कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये २०६ सुरक्षा रक्षक, १५ मेस्को सुरक्षा रक्षक, १६ सफाई कामगार आणि नियंत्रण कक्ष व सीएफसी केंद्रात १६ असे एकून २६० बाह्यस्त्रोत कर्मचारी आहेत.
महावितरणच्या बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांना निर्धारित वेळेवर मिळणार वेतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 2:25 PM
अकोला : महावितरणमध्ये कार्यरत बाह्यस्त्रोत कर्मचाºयांना मासिक वेतन निर्धारित वेळेत मिळावे यासाठी सर्व संबंधितांनी विविध अधिनियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश महावितरणचे संचालक (वित्त) सुनिल पिंपळखुटे यांनी दिले आहेत.
ठळक मुद्देप्रभावी अंमलबजावणी करण्याचे वित्त संचालकांचे निर्देश